Earthquake दिल्ली : जम्मू-काश्मीरसह दिल्ली भूकंपाच्या धक्क्याने शनिवारी (ता.०५) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हादरली आहे.(Earthquake) भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पाहायला मिळाले आहे. (Earthquake)
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदुकुशमध्ये होता. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्येही त्याचे धक्के जाणवले आहेत. केंद्र हिंदुकुशमध्ये असल्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारत या तिन्ही देशांना याचे धक्के जाणवले आहेत. (Earthquake)
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच दिल्ली-एनसीआरही भूकंपाच्या धक्क्यांमुळे हादरली आहे. आतापर्यंत जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र या भूकंपाची तीव्रता ५.८ इतकी होती. ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप हा मध्यम तीव्रतेचा भूकंप मानला जातो. (Earthquake)