अरुण भोई
Daund News : राजेगाव : राजेगाव परिसरात तीन विद्युत रोहित्रांमधील तांब्याच्या तारांची चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
या परिसरात अनेक दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी होते. गणरायाच्या आगमनानंतर येथे पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. IDaund News) पीकाला पाणी मिळत असल्याने, नदी वरील पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटरींकडे जाण्याचे प्रमाण कमी झाले. यामुळेच ही चोरी झाली, असे मत राजेगाव ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
महावितरण सबस्टेशनची गरज
येथील भिमा नदीवर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटरी आहेत. नदीला पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे आणि शेतकरी नदी पहाणीसाठी गेले असता, त्यांना ३ विद्युत रोहित्र खाली पडलेल्या स्थितीत पाहायला मिळाली. तर अण्णा जामले या शेतकऱ्याची पाच एचपीची पाणबुडी मोटर देखील चोरी झाल्याचे निदर्शनास आले. (Daund News) त्यांनी स्थानिक वायरमन पोळ यांना फोन केला. त्यानंतर दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवली.
या वेळी स्थानिक शेतकरी संतोष जगताप, सतिश कदम, संजय जामले, जाधव,सोनेशे चोपडे, तसेच अनेक शेतकऱ्याकडून महावितरणला सबस्टेशनची गरज असल्याचे सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : ‘मागेल त्याला विहीर’ योजना दुष्काळग्रस्त भागासाठी ठरतीये नवसंजीवनी
Daund News : डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दौंडमध्ये स्वच्छता मोहीम