Daund News : दौंड : दापोली येथील स्टेट बँकेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून नोकरीला असणाऱ्या नीलिमा सुधाकर चव्हाण (वय २४) या तरुणीचा २९ जुलै २०२३ रोजी कामावरून घरी परतत असताना अपहरण करून निघृण खून करण्यात आला होता. या घटनेचे संतप्त पडसाद अद्यापही उमटत आहेत. क्रूरपणे हत्या करणाऱ्या या समाजकंटकांना त्वरित अटक करावी, अशी मागणी दौंड येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे करण्यात आली. अन्यथा दौंड संघटना रस्त्यावर उतरेल व होणाऱ्या परिणामांना प्रशासनाला जबाबदार रहावे लागेल, असा इशारा देखील संघटनेतर्फे देण्यात आला आहे. (Daund News)
क्रूरपणे हत्या करणाऱ्या या समाजकंटकांना त्वरित अटक करावी
ओमळी (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे एक धक्कादायक घटना घडली होती. नीलिमा सुधाकर चव्हाण या तरुणीचे अपहरण करून, तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिच्या डोक्यावरील केस काढून, चेहरा विद्रूप करून, तिचा खून करण्यात आला. तिचा मृतदेह दाभोळ येथील खाडीमध्ये फेकून देण्यात आला. तपास करत असताना तिचा मृतदेह खाडीत आढळून आला. असे अमानवी कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करावी, व गरीब कुटुंबातील मुलीला त्वरित न्याय मिळावा, यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या दौंड संघटनेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. (Daund News)
याबाबतचे निवेदन दौंड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या दौंड शाखेचे गणेश उत्तम साळुंखे यांच्या स्वाक्षरीतील पत्र पोलिसांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य कोर कमिटीचे अध्यक्ष सुभाष आप्पा जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष मारुती आप्पा पंडित, तालुका अध्यक्ष गणेश साळुंखे, शहराध्यक्ष रवींद्र बंड, ज्येष्ठ मार्गदर्शक महादेव साळुंखे, बबन जाधव, शिवाजी साळुंखे, गोरख साळुंखे, रुपेश बड, नागेश जाधव, विशाल शिंदे, निलेश काळे, मोहन ताटे, राजेंद्र गायकवाड, श्रीकांत राऊत तसेच नाभिक बांधव मोठ्या उपस्थित संख्येने उपस्थित होते. (Daund News)