Daund News : दौंड, (पुणे) : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील एका गरीब कुटुंबाला वेगवेगळे आमिष दाखवून ख्रिश्चन धर्मात प्रवेश करा, मुलांचे लग्न होईल, घरातील समस्या दूर होतील, असे सांगून धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केल्याप्रकरणी दौंड येथील तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. (Daund News)
नम्रता व्यंकटेश वारनसे (२७, रा. पानसरे वस्ती, ता. दौंड), शारदा आकाश सौंदडे (२७, रा.विघ्ने वस्ती, ता. दौंड), वैशाली सुनील पवार (३६, रा. विघ्ने वस्ती, ता. दौंड) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी मयूर मदरे (वय- २०, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. नगर) यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Daund News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिसरात मदरे हे आई व भावासहित राहतात. शनिवारी (ता. १७) सकाळी दौंड येथील ख्रिश्चन महिला नम्रता वारनसे, शारदा सौंदडे, वैशाली पवार, या तिघीजण महिला सकाळी मदरे यांच्या घरी आल्या होत्या. यावेळी त्यांनी वेगवेगळे आमिष दाखवून ख्रिश्चन धर्मात प्रवेश करा, खिश्चन धर्माबाबत माहिती दिली. मुलांचे लग्न होईल, घरातील समस्या दूर होतील, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, असे सांगितले. (Daund News)
यावेळी सदर तीन महिलांनी मदरे व त्यांच्या आईच्या कपाळावर तेल लावून धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केली व प्रार्थना म्हटली. यावेळी प्रकाश मदरे व त्यांची आईने त्या धर्मात जाण्याची इच्छा नाही असे सांगितले. त्यानंतर त्या ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी बळजबरी करू लागल्या. तरी देखील घरात आलेल्या महिलांनी तुम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली नाही तर तुमचे वाईट होईल असे सांगितले. (Daund News)
दरम्यान, प्रकाश मदरे यांनी याबाबत प्रतीक पाचपुते यांना बोलावून या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी या महिलांकडे चौकशी केली. त्यांच्या बोलण्यात काही संशयास्पद बाबी आढळल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये आणखी कोण सहभागी आहे का याचा तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहेत. (Daund News)