अरुण भोई
Daund News : दौंड : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या उर्वरित रकमेचा धनादेश काढण्यासाठी १० हजार रुपये लाच स्वीकारताना दौंड नगरपरिषदेतील प्रधानमंत्री आवास योजना अभियंता व प्रकल्प सल्लागार अभियंता यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई दौंड नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये केली. प्रधानमंत्री आवास योजना अभियंता विजय दिगंबर नाळे, प्रकल्प सल्लागार अभियंता प्रशांत मधुकर जगताप असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोन अभियंत्यांची नावे आहेत.
दौंड नगरपरिषदेच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
याबाबत ५२ वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदारांच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या उर्वरित रकमेचा चेक काढण्यासाठी यातील प्रधानमंत्री आवास योजनेचा अभियंता विजय नाळे यांनी ५० हजार रुपये लाच मागितली. (Daund News) तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदारांनी याबाबत पुणे एसीबीकडे तक्रार केली.
दर्यान, प्राप्त तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता, विजय नाळे यांनी तक्रारदारांकडे ५० हजार रुपये लाच मागून तडजोडीअंती ३० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यातील अॅडव्हान्स म्हणून १० हजार रुपये लाच स्वीकारली आहे. (Daund News) तसेच यातील प्रकल्प सल्लागार अभियंता प्रशांत मधुकर जगताप यांनी नाळे यांच्या लाच मागणीस दुजोरा देऊन लाच रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्या दोघांनाही एसीबीने ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वीरनाथ माने, पोलीस अंमलदार रियाज शेख, सुरडकर, माने, चालक जाधव यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंडमधील भूमिगत उच्चदाब वाहिनीचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते भूमिपूजन
Daund News : शेतातील पिवळं सोनं जगविण्याचे फूल उत्पादक शेतकऱ्यांसमोर आव्हान
Daund News : निवडणूक आयोगाचा ‘सर्व्हर डाऊन’; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची तारांबळ