(Daund Crime News ) यवत : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जावजीबुवाची वाडी येथे रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत पोलीस पाटील तुकाराम कुडीतकर यांनी यवत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
रमजान अल्लउद्दीन महाजन (वय-४४ रा.म्हैसगाव ता.माढा जि. सोलापुर) असे मृतदेहाचे नाव आहे. मृताच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डवरून ही ओळख पटली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
गुरुवार (ता.२७ ) रोजी दुपारी दोनच्या सुमारास आर.पी.एफ.चे पोलीस उपनिरीक्षक ओझा यांनी पोलिस पाटील तुकाराम कुडीतकर यांना फोनवरून रेल्वे किमी नं. २८८ , २/३ च्या रेल्वे रुळाच्या दक्षिण बाजुस काट्यांमध्ये एक पुरूषाचा मृतदेह असल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलीस मित्रांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यामध्ये हा मृतदेह आठ ते दहा दिवसांपुर्वीचा असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस हवालदार गोसावी हे करीत आहेत