Cyber Crime | पुणे : आभारी चलनात गुंतवणूक करुन मोठा फायदा होण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूनक होताना दिसून येत आहे. दरम्यान असाच एक प्रकार पुणे शहरातून समोर आला आहे. आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची तब्बल एक कोटी १२ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॅनियल कूपर, अलेक्झांडर हुडहेड यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी मध्ये राहावयास असणारे व्यावसायिक यांना सायबर चोरट्यांनी एक ई-मेल पाठवला. त्यामध्ये आभासी चलणात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे व्यावसायिकास आमिष दाखवले. त्यानंतर आरोपींनी व्यावसायिकांच्या मोबाईलवर संपर्क केला व आभासी चलन गुंतवणूक योजनेची माहिती त्यांना जाळ्यात ओढले.
या आमिषाला बळी पडून व्यावसायिकाने वेळोवेळी एक कोटी १२ लाख ६० हजार रुपये आरोपींच्या बॅक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर केले. त्यानंतर मात्र त्यांना कोणताच परतावा मिळाला नाही. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.