(Crime News) दौंड : दौंड (daund)शहरातील एका महिलेची तब्बल 40 लाख रुपयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाने महिलेला पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले या आमिषाला बळी पडणे महिलेला चांगलेच महागात पडले आहे. महिलेची 15 लाख 48 हजार रु. रोख रक्कम व 19 लाख 50 हजार रुपयांच्या 39 तोळे सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाली आहे.
याप्रकरणी सुधा गौरव साळवे (रा. गजानन सोसायटी, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलीसांनी मोजेस दीपक उजागरे (रा. गजानन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि.3 ऑगस्ट 2022 ते दिनांक 4 नोव्हेंबर 2022 दरम्यान घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवत त्यांच्याकडून वेळोवेळी 15 लाख 48 हजार रुपयांची रोख रक्कम घेतली. फिर्यादी यांनी आरोपीला आपल्याकडे असणारी सर्व रोख रक्कम दिल्यानंतरही आरोपीकडून त्यांना आपल्या रकमेचा कोणताच परतावा न मिळाल्याने त्यांनी त्याच्याकडे दिलेल्या पैशाची वारंवार मागणी केली असता, तुम्ही मला आणखीन पैसे दिले नाही तर अगोदर दिलेले तुमचे सर्व पैसे बुडतील अशी भीती दाखविली.
दरम्यान, पैसे जातील या भीतीपोटी महिलेने आपल्याकडे असणारे सर्व पैसे संपले आहेत असे सांगितले. त्यानंतर आरोपीने तुमच्याकडे जे सोन्याचे दागिने आहेत ते मला द्या. मी ते गहाण ठेवून पैसे आणतो व संबंधितांना देतो म्हणजे तुमचे सर्व पैसे तुम्हाला परत मिळतील असे सांगून पुन्हा एकदा फसविले व यांच्याकडून तब्बल 39 लाख 98 हजार रुपये घेऊनही त्यांना कोणताही परतावा किंवा पैसे न देता त्यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
वन विभागात नोकरीच्या आमिषाने तरुणांना ११ लाखांचा गंडा घालणाऱ्याला बोरगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या&