पुणे Breaking News : पुणे शहरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. (Breaking News) केवळ दीड हजार रुपयांसाठी एकाचा खून करण्यात आला आहे. (Breaking News) जुन्या मोबाईलचे दीड हजार रुपये न दिल्यामुळे रागात तरुणाने एकावर ब्लेडने सपासप वार केले व डोक्यात मारून खून केला. (Breaking News) हा प्रकार वारजे पुलाजवळील पृथक बराटे गार्डनसमोर फुटपाथवर शनिवारी रात्री ११ वाजता घडला आहे. (Breaking News)
वारजे माळवाडी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
अमरजीत जगन्नाथ गोयल (वय ५०, रा. वारजे पुलाजवळ, मुळ रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीसांनी राम श्रीमंत वाघमारे (वय २०, रा. वारजे पुलाजवळ, फुटपाथवर, वारजे) याला ताब्यात घेतले आहे. पोलीस नाईक राहुल कदम यांनी पोलीसात फिर्याद दाखल केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, वारज्यातील पुलाजवळ असलेल्या बराटे गार्डनसमोर फुटपाथ एक जण जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले व त्यांला रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रुग्णालयात पोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्याचा खून करण्यात आला असल्याचे अहवालात स्पष्ट झाले. या अहवालात गळ्यावर ब्लेडने वार केल्याचे तसेच डोक्यात मारहाण केल्याने झालेल्या जखमांमुळे त्याचा मृत्यु झाल्याचे म्हटले.
पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यावर निलेश खोजे व गणेश टाळकुटे यांच्याकडून माहिती मिळाली. अमरजीत गोयल व राम वाघमारे हे दोघेही फुटपाथवर रहात होते. गोयल याला वाघमारे याने जुना मोबाईल दिला होता. मात्र, त्याचे दीड हजार रुपये गोयल देत नव्हता. त्याच्यातून दोघांमध्ये वाद झाला. त्यात वाघमारे याने त्याला मारहाण करुन ब्लेडने वार केले. यामध्ये गोयलचा मृत्यु झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime | दारुड्या वडिलांचा मुलाकडून डोक्यात दगड घालून खून ; मुळशीतील घटना, आरोपी अटकेत