दिनेश सोनवणे
दौंड : उसाने भरलेल्या टॅक्टरला पाठीमागून दुचाकीची धडक बसल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दौंड-पाटस अष्टविनायक मार्गावरील स्वानंद हॉटेलच्या परिसरात घडली.
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात झाला असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती.
या अपघातात गणेश बापू शिंदे (वय २४), ऋषिकेश महादेव मोरे (वय २३) व स्वप्नील सतीश मनोचार्य (वय २४, सर्व राहाणार काष्टी ता श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सध्या कारखान्यांचा हंगाम सुरु झाला असून अनेक शेतकरी आपला ऊस गाळपाला नेण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करतात. मात्र या ट्रॅक्टर मालक चालक, अनेकदा वाहतूक पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उललंघन करत वाहने चालवत असतात.
ट्रॉलीच्या मागच्या बाजूस रिफ्लेक्टर लावण्यात याव्यात यासाठी पोलिसांच्या वतीने यापूर्वी अनेकदा जनजागृती करण्यात आली होती. अनेकांना दंड देखील करण्यात आला होता.
मात्र अजुनही अनेक ट्रॅक्टर चालक नियमांची पायमल्ली करत वाहन चालवून अनेकांच्या अपघाती मृत्यूचे कारण ठरत आहेत.