Bike Race पुणे : प्रेयसीवर इम्प्रेशन मारण्यासाठी बाईक चालवताना स्टंटबाजी करण्याचे प्रकार नवीन नाहीत. मात्र, हे प्रकार जीवावर देखील बेतू शकतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ पोलिसांच्या हाती आला. हा व्हिडीओ ट्विटच्या माध्यमातून शेअर करत पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित गाडी चालविण्याचा सल्ला दिला आहे. (Bike Race) त्याचबरोबर खाली एक कॅप्शन लिहीलं आहे. त्यामध्ये त्यांनी जब वी मेट चित्रपटातील गाणे लावले आहे. त्या गाण्यामध्ये “ये रिस्क हाए, बैठे बिठाए, हड्डियां तुड़वाए…” असे शब्द लिहिले आहेत. (Bike Race)
एका तरुणाचा गाडी चालवतानाचा २८ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. एक जोडपं त्यावर खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. स्टंटचा परिणाम व्हायचा तोच झाला आहे. तरुण आणि तरुणी जोरात जमिनीवर आपटले आहेत. दिल्ली पोलिसांनी तो व्हिडीओ शेअर करत एक कॅप्शन लिहीलं आहे. “ये रिस्क हाए, बैठे बिठाए, हड्डियां तुड़वाए.”
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी हा व्हिटीओ ट्विटच्या माध्यमातून नागरिकांसमोर आणला आहे. तो व्हिडीओ शेअर करीत असताना त्यांनी लोकांना आणि तरुणाला एक सल्ला दिला आहे. दिल्ली पोलिसांनी ट्विट शेअर करत सुरक्षित गाडी चालवण्याचा सल्ला दिला आहे. चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यास अपघात होण्याची अधिक शक्यता असते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव केला आहे.