Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Politics News : स्वत:कर्तृत्व असल्याशिवाय जनता निवडून देत नाही… शरद पवार यांचं पंतप्रधानांना सडेतोड प्रत्युत्तर!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 29 June 2023, 17:48

Politics News पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला मतं द्याल, तर शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे यांचे भले होईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. या आरोपाला आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. (Politics News)  निवडणूक लढवताना पहिल्यावेळी पूर्वपुण्याई उपयोगी पडते. परंतु माझी मुलगी स्वकर्तृत्वाने तीनवेळा निवडून आली आहे. संसदरत्न म्हणून तिला उच्च दर्जाचा क्रमांक आहे. तिला आठवेळा पुरस्कार मिळाला. स्वत:चं कर्तृत्व असल्याशिवाय जनता वारंवार निवडून देत नाही. मोदींनी अशी बेताल वक्तव्य करणे हे अशोभणीय आहे, असे शरद पवार म्हणाले. (Politics News)

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, मी पंतप्रधानांवर कधीही व्यक्तीगत टीका करणार नाही. कारण देशाच्या उच्चपदावर विराजमान असलेल्या व्यक्तिचा सन्मान ठेवला पाहिजे. पण एवढंच सांगेन की संसदेच्या सदस्याबद्दल असं मत व्यक्त करणं योग्य नाही.

शरद पवार यांनी महिला आणि मुली यांच्यावरील हल्ल्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. मी महाराष्ट्रातील काही ठिकाणांची अधिकृत माहिती सरकारकडून मिळवली आहे. मला सर्व महापालिकांची माहिती मिळाली नाही. पण पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूरची माहिती मिळाली. २३ जानेवारी ते २३ मे या कालावधीत पुण्यातून ९३७ मुली अथवा महिला या बेपत्ता आहेत. ठाणेमधून ७२१ बेपत्ता आहेत. मुंबईतून ७३८ आणि सोलापूर ६२ बेपत्ता आहेत. हा आकडा २४५८ आहेत.

 

बुलढाणा, धुळे, पुणे ग्रामीण, वाशिंद, अमरावती, जळगाव, भंडारा, रत्नागिरी आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण एकूण ४४३१ मुली-महिला या बेपत्ता आहेत. दीड वर्षाच्या काळात बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या एकूण ६८८९ आहे. एवढ्या मुली-महिला बेपत्ता होतात, ही शरमेची बाब आहे. गृहमंत्र्यांनी इतर वक्तव्य करण्यापेक्षा बेपत्ता महिला आणि मुलींना शोधलं पाहिजे, अशा शब्दांत पवार यांनी गृहमंत्र्यांना सुनावले.

शिखर बँकेबद्दल मोदींनी केलेल्या वक्तव्यावर देखील पवार यांनी भाष्य केले. शिखर बँक सोडा, मी कोणत्याच इतर बँकेतून कर्ज घेतलं नाही. शिखर बँकेसंदर्भात मागे एकदा तक्रार झाली होती. चौकशी झाली होती. राष्ट्रवादीची काही लोकांची नावं समोर आली होती. भाजपमधील काही लोकांची नावं आली. त्यावर चौकशी करण्याची जबाबदारी राज्यावर होती. त्यावेळी राज्याचं मुख्यमंत्रीपद भाजपकडे होतं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्या संबंध काळात त्यांनी काय केलं मला माहिती नाही. शिखर बँकेचा उल्लेख करण्याची गरज होती का, ते मला माहिती नाही. अशा कुठल्याही संस्थेशी आमचा संबंध नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36
Next Post

Daund News : अवघ्या तीनच दिवसांत तब्बल दहा हजार महिलांनी केले 'महिला सन्मान बचतपत्र'; सुमारे 39 कोटींची गुंतवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.