Big News : मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. जर पैसे दिले नाहीत, तर ठार मारण्याची धमकी दिली आहे. पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात देण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
गावदेवी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या ईमेल आयडीवर शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा ईमेल पाठवला होता. (Big News ) “तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम शूटर आहेत”, असं धमकी देणाऱ्या व्यक्तीने ई-मेलमध्ये म्हटलं होतं.
याप्रकरणी मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींनी पोलिसांत धाव घेतली. (Big News ) त्यानंतर गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांना देखील अज्ञात व्यक्तीने फोन करुन उद्योगपती मुकेश अंबानी यांचे बंगले बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. (Big News ) या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती. याप्रकरणी बिहार येथील एका व्यक्तीला अटक केली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : ओळख लपवून लग्न करणे; अथवा संबंध ठेवणे; गुन्हा…! होणार 10 वर्षांपर्यंतची शिक्षा..