Big Breaking News लोणी काळभोर (पुणे) : आळंदी म्हातोबाची गावच्या डोंगरात आठ दिवसांपूर्वी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून इंधन चोरी करणाऱ्या लोणी काळभोरच्या इंधनमाफिया प्रविण मडखांबे व त्याच्या दोन सहकाऱ्यांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. (Big Breaking News)
लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट पुर्व हवेलीमधील बडा इंधनमाफिया प्रविण मडखांबेला अटक केल्याने, लोणी काळभोर व परीसरातील इंधन माफियात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसात या व्यवसायातील आणखी काही ‘बडे मासे’ पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता असुन, पोलिसांनी तशा हालचालीही सुरु केल्या आहेत. (Big Breaking News)
दरम्यान आळंदी म्हातोबाची हद्दीतील डोंगरात २५ जुलैला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून इंधन चोरी करणाचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले होते. यात पोलिसांनी प्रविण सिद्राम मडीखांबे (वय ५१ रा. फ्लॅट नं. ९, श्री संतोषी बिल्डींग, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या पूर्व हवेलीमधील बड्या इंधन माफियासह विशाल धानाजी धायगुडे (वय ३१), बाळू अरुण चौरे (वय ३०, दोघेही सिद्राममळा, लोणी काळभोर, ता. हवेली) या तिघांना अटक केली आहे. या तिघांना मंगळवारी (ता.१) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तीनही आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून सातारा, सोलापुरसह इतर जिल्ह्यातील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या तेल डेपोंना जमिनीखालील पाईपलाईनमधुन पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जातो. ही जमिनीखालील पाईपलाईन आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) हद्दीतील निर्जन डोंगरात मंगळवारी (ता.२५) मध्यरात्री सुमारास फोडून, त्यातून इंधन चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापक गौरव केमचंद गुप्ता (वय ३२) यांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या तपासात प्रविण मंडखांबे व त्याचे तीन सहकारी निष्पन्न झाले आहेत. (Big Breaking News)
आणखी मासे जाळ्यात अडकणार का?
इंधन चोरीच्या काळ्या साम्राज्यातील आणखी काही मासे जाळ्यात अडकणार का? याकडे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आळंदी म्हातोबाची इंधन चोरी प्रकरणात ताब्यात घेतलेल्या प्रविण मंडखांबेवर यापूर्वीही इंधन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रविण हा चार महिन्यांपूर्वी अशाच एका प्रकरणात तुरुंगात गेला होता. प्रविण हा इंधन चोरीच्या रॅकेटमधील म्होरक्या असून, त्याचे अनेक साथीदार लोणी काळभोर व परीसरात मागील दहा ते बारा वर्षांपासुन राजरोसपणे इंधन चोरी करत आहेत. लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची मागील कारकिर्द पाहता याही प्रकरणात चव्हाण इंधन चोरीच्या तळाशी जाऊन तपास करण्याची शक्यता आहे. यामुळे इंधन चोरीच्या काळ्या साम्राज्यातील आणखी काही मासे जाळ्यात अडकणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Big Breaking News)
इंधनमाफियांना आतातरी मोक्का लागणार का?
लोणी काळभोर व आसपासच्या गावात दहा ते बारा मोठे इंधनमाफिया मागील दहा ते बारा वर्षांपासुन राजरोसपणे इंधन चोरी करत आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक विविध गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी मागील गुन्हाच्यावेळीही प्रविण मडखांबे व त्याच्या सहकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही कारणामुळे मागील वेळी न झालेली मोक्काची कारवाई यावेळी तरी होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Big Breaking News)