Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : आळंदी म्हातोबाची येथे ‘एचपी’ची जमिनीखालील पाईपलाईन फोडणारा इंधनमाफिया अखेर अटकेत, लोणी काळभोरच्या प्रविण मडखांबेसह तिघांना बेड्या, इंधन चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येणार?

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Tuesday, 1 August 2023, 20:08

Big Breaking News लोणी काळभोर (पुणे) : आळंदी म्हातोबाची गावच्या डोंगरात आठ दिवसांपूर्वी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून इंधन चोरी करणाऱ्या लोणी काळभोरच्या इंधनमाफिया प्रविण मडखांबे व त्याच्या दोन सहकाऱ्यांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. (Big Breaking News)

लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट पुर्व हवेलीमधील बडा इंधनमाफिया प्रविण मडखांबेला अटक केल्याने, लोणी काळभोर व परीसरातील इंधन माफियात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसात या व्यवसायातील आणखी काही ‘बडे मासे’ पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता असुन, पोलिसांनी तशा हालचालीही सुरु केल्या आहेत.  (Big Breaking News)

दरम्यान आळंदी म्हातोबाची हद्दीतील डोंगरात २५ जुलैला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची जमिनीखालील पाईपलाईन फोडून त्यातून इंधन चोरी करणाचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले होते. यात पोलिसांनी प्रविण सिद्राम मडीखांबे (वय ५१ रा. फ्लॅट नं. ९, श्री संतोषी बिल्डींग, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली) या पूर्व हवेलीमधील बड्या इंधन माफियासह विशाल धानाजी धायगुडे (वय ३१), बाळू अरुण चौरे (वय ३०, दोघेही सिद्राममळा, लोणी काळभोर, ता. हवेली) या तिघांना अटक केली आहे. या तिघांना मंगळवारी (ता.१) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तीनही आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून सातारा, सोलापुरसह इतर जिल्ह्यातील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या तेल डेपोंना जमिनीखालील पाईपलाईनमधुन पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जातो. ही जमिनीखालील पाईपलाईन आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) हद्दीतील निर्जन डोंगरात मंगळवारी (ता.२५) मध्यरात्री सुमारास फोडून, त्यातून इंधन चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापक गौरव केमचंद गुप्ता (वय ३२) यांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या तपासात प्रविण मंडखांबे व त्याचे तीन सहकारी निष्पन्न झाले आहेत. (Big Breaking News)

आणखी मासे जाळ्यात अडकणार का?

इंधन चोरीच्या काळ्या साम्राज्यातील आणखी काही मासे जाळ्यात अडकणार का? याकडे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आळंदी म्हातोबाची इंधन चोरी प्रकरणात ताब्यात घेतलेल्या प्रविण मंडखांबेवर यापूर्वीही इंधन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रविण हा चार महिन्यांपूर्वी अशाच एका प्रकरणात तुरुंगात गेला होता. प्रविण हा इंधन चोरीच्या रॅकेटमधील म्होरक्या असून, त्याचे अनेक साथीदार लोणी काळभोर व परीसरात मागील दहा ते बारा वर्षांपासुन राजरोसपणे इंधन चोरी करत आहेत. लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची मागील कारकिर्द पाहता याही प्रकरणात चव्हाण इंधन चोरीच्या तळाशी जाऊन तपास करण्याची शक्यता आहे. यामुळे इंधन चोरीच्या काळ्या साम्राज्यातील आणखी काही मासे जाळ्यात अडकणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Big Breaking News)

इंधनमाफियांना आतातरी मोक्का लागणार का?

लोणी काळभोर व आसपासच्या गावात दहा ते बारा मोठे इंधनमाफिया मागील दहा ते बारा वर्षांपासुन राजरोसपणे इंधन चोरी करत आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक विविध गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी मागील गुन्हाच्यावेळीही प्रविण मडखांबे व त्याच्या सहकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही कारणामुळे मागील वेळी न झालेली मोक्काची कारवाई यावेळी तरी होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Big Breaking News)

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Pune News : दहाव्या मजल्यावर लिफ्ट थांबली अन् धाडकन खाली कोसळली, मायलेकरं मात्र...; व्हिडिओ होतोय व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.