Big Breaking News दौंड : केडगाव येथील (ता. दौंड) येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये एक धक्कादायक घटना घडली. या मिशनमध्ये असणाऱ्या तीन गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. मिशमध्ये काम करणाऱ्या एका मजुरानेच हे दुष्कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. (Big Breaking News)
याप्रकरणी मजुरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला यवत पोलिसांनी अटक केली आहे. (Big Breaking News) सुभाष झोरे (वय 35 रा. केडगाव ता. दौंड, पुणे) असे या नराधमाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ‘पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या मजुराने तीन गतिमंद मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत’.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांची धाव
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागाचे पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे आदींनी पंडिता रमाबाई मुक्ती मिशनमध्ये धाव घेतली.
गुन्हा दाखल करून आरोपी अटकेत
या गंभीर प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आली असून, पुढील तपास दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव करत आहेत.