Big Breaking News पुणे : शहरांतर्गत हडपसर, मुढंवा, लोणी काळभोर, लोणीकंद, येरवडा, चंदननगर, कोंढव्यासह पुण्याच्या पूर्व भागातील बहुतांश पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, गांजा विक्री, गावठी दारु विक्रीसह सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे स्तोम माजले आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पाठीशी अवैध धंदे ही एक बाब असून, पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी सक्तीची पावले उचलावीत, अशी मागणी पुणे शहरातील नागरिकांकडून होत आहे. (Big Breaking News)
पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रत्येक बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांचा घाम काढत असताना, दुसरीकडे मात्र त्यांच्याच हाताखालील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे वापरुन, शहर पोलीस दलातील १५ ते १६ पोलीस कर्मचारी हडपसर, मुढंवा, लोणी काळभोर, लोणीकंद, येरवडा, कोंढव्यासह पुण्याच्या पूर्व भागातील बहुतांश पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांच्या वाढीसाठी तन, मन, धनाने प्रयत्न करत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. (Big Breaking News)
पुणे शहरांतर्गत ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोठेही अवैध धंदे, जुगार, दारु अड्डे आढळून आल्यास त्याला सर्वस्वी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरिक्षकाला जबाबदार धरण्यात येणार असल्याची भिमगर्जना पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी केली असली तरी, शहराच्या बहुतांश पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मटका, जुगार, गांजा विक्री, गावठी दारु विक्रीसह सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे स्तोम माजले असल्याची चर्चा आहे. (Big Breaking News)
पुणे शहर पोलीस दलातील तीन नंबर अधिकाऱ्यापासून ते थेट डिसीपी, पोलिसांच्या विविध शाखा, विविध युनिट अशा सर्वच शाखा प्रमुखांच्या नावाने शहर पोलीस दलातील १५ ते १६ पोलीस कर्मचारी (जे स्वतःला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कलेक्टर असल्याचे सांगतात) पोलीस स्टेशननिहाय ५ लाखांपासून १५ लाखापर्यंतची माया गोळा करत असल्याची चर्चा आहे. (Big Breaking News)
हडपसर, मुंढवा, येरवडा, चंदननगर, लोणी काळभोर, लोणीकंद यासारख्या शहराच्या पूर्व भागातील प्रमुख पोलीस ठाण्यांचा विचार केल्यास, सर्वाधिक अवैध धंदे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर सर्वांत कमी अवैध धंदे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची चर्चा आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाळीसहून अधिक मोठे तर किरकोळ शंभरहून अधिक विविध प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे चालू असल्याची चर्चा आहे. मुंढवा, लोणी काळभोर, लोणीकंद, येरवडा, चंदननगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असून, लोणीकंद हद्दीतील अवैध धंद्यांची लिस्ट छोटी असल्याची माहिती पुढे आली आहे. (Big Breaking News)
चहापेक्षा किटली गरम…
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना दिलेल्या असल्या, तरी त्यांच्या हाताखालील बहुतांश वरिष्ठ पोलीस अधिकारी अवैध धंद्यांना अघोषित पाठींबा देत असावेत अशी परीस्थिती “कलेक्टर” म्हणवल्या जाणाऱ्या शहर पोलीस दलातील १५ ते १६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या वागण्यामुळे निर्माण झालेली आहे. (Big Breaking News)
एसीपी (एक व दोन), डिसीपी, डीसीपी क्राईम, नाक्रोटीक्स, मोक्का बी पथक, खंडणी, दरोडा, विविध युनिट, सामाजिक, प्रशासन, क्राईम पीआय, पीसीबी अशा बाराहून अधिक वरीष्ठ अधिकाऱ्यांचे “कलेक्टर” हडपसर, मुढंवा, येरवडा, चंदननगर, लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रत्येक छोट्या-मोठ्या अवैध धंध्यावर स्वतः जाऊन हप्ता गोळा करत आहेत. हप्ता कमी मिळाल्यास “कलेक्टर” लोकच आपल्या साहेबांचा हप्ता वाढवून मिळवण्यासाठी, अवैध धंदेवाल्याला त्याचा धंदा मोठा करण्याबाबत मार्गदर्शनही करत असल्याच्या चर्चा आहेत. (Big Breaking News)
वरिष्ठांच्या “कलेक्टर”वर कारवाई होणार का?
हडपसर, मुढंवा, येरवडा, चंदननगर, लोणी काळभोर, लोणीकंद सारख्या शहराच्या पूर्व भागातील प्रमुख पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैूध धंदेवाल्यांकडून हप्ते गोळा करण्यासाठी एसीपी (एक व दोन), डिसीपी, डीसीपी क्राईम, नाक्रोटीक्स, मोक्का बी पथक, खंडणी, दरोडा, विविध युनिट, सामाजिक, प्रशासन, क्राईम पीआय, पीसीबी अशा बाराहून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने पंधराहून अधिक “कलेक्टर” राजरोसणे फिरत आहेत. या कलेक्टर लोकांचा रुबाब, त्यांच्या गाड्या, त्यांचे वागणे सर्वच कौतुकाची बाब असते. हे कलेक्टरच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने अवैध धंदे वाल्यांना पाठींबा देत असल्याचे सत्य असून, या सर्वच “कलेक्टर” सर्वांना माहिती झाले आहेत.
दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार हे प्रामाणिक अधिकारी असून, अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या कलेक्टर रुपी पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.