Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

School News : पूर्व हवेलीत इंग्रजी शाळांचं ही ”नाव मोठं अन् लक्षण खोटं”,…’

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Thursday, 27 July 2023, 19:30

School News लोणी काळभोर  : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासुन पूर्व हवेलीमधील प्राथमिक व माध्यमिक विभाग सपशेल ‘फेल’ झाल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे प्राथमिक व माध्यमिक मराठी माध्यमांच्या शाळांच्या प्रमानेच पुर्व हवेलीमधील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या शाळांची गुणवत्ता देखील चर्चा करण्याच्याही पलीकडे गेली असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात होत आहे. मराठी माध्यमाप्रमानेच शासकीय पातळीवरुन इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गुणवत्ता तपासणी होण्याची गरज असुन, पालकांनीही शाळांच्या दर्जा तपासणीसाठी आग्रह धरण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. (School News)

पुर्व हवेलीत साठहुन अधिक छोट्या-मोठ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा असुन, या शाळात पालक वर्षाकाठी लाखो रुपये खर्चून चांगले शिक्षण विकत घेतल्याचे समाधान मिळवत असतात. मात्र, वरकरणी रंगरंगोटी केलेले वर्ग, मुलांना झकपक ड्रेस, बूट, सॉक्स, टाय, स्कूल बॅग, वॉटरबॅग अशा ‘सो कॉल्ड’ भौतिक वातावरणात वावरणाऱ्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता तपासणीसाठी कोणतीही शासकीय फुटपट्टी नसल्याने बहुतांश शाळाचा क्षैसणिक दर्जा गुलदस्त्यात राहतो आहे. यामुळे पुर्व हवेलीमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळा झाकली मुठ सव्वा लाखाची या न्यायाने आपल्याच गुर्मीत वावरत असल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे. (School News)

पुर्व हवेलीमधील पालकांकडून मिळणाऱ्या प्रचंड पैशांतून इंग्रजी माध्यमांच्या शाळांची लाखोंची कमाई दरवर्षी होत आहे. यातून त्यांच्या टोलेजंग इमारती, इतर भौतिक सुविधा निर्माण झाल्या आहेत. या सुविधा पाहून पालक सुखावतात. मात्र, वारेमाप पैसा खर्च करूनही शिक्षणाच्या दर्जाचे काय? आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतंय का? मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत काय सुधारणा होते? हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात, हे कटू सत्य आहे. ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तुटपुंज्या मानधनावर शाळा शिक्षकांना राबवून घेतात. इंग्रजी माध्यमाच्या कायम विनानुदानित शाळा शिक्षकांच्या शोषणाचे अड्डे बनल्या आहेत. (School News)

 

इंग्रजी शाळांना चांगले शिक्षक मिळेना

ग्रामीण भागातील इंग्लिश शाळांना चांगले शिक्षक मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांना पुढे फक्त आणि फक्त ‘एक्झिक्युटिव्ह’ व्हायचे असते. त्यांच्यासमोर चांगला शिक्षक होणे हे उद्दिष्ट कधीच नसते. चुकून चांगले शिक्षक मिळाले तर ते तुटपूंज्या पगारावर फार दिवस टिकत नाहीत. ते स्टेशनवर उभे राहिल्यासारखे शाळेत थांबतात. चांगल्या पगाराची नोकरी मिळाली की ते निघून जातात. त्यामुळे शिक्षकांचे येणे-जाणे, नोकर्‍या सोडणे-धरणे नित्याचे झाले आहे.  (School News)

वर्षभरात वर्गाला चार-चार शिक्षक होतात. परिणामी, इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळा चांगल्या शिक्षकांच्या शोधात असतात, आहेत. मग अशी दैना असेल तर तेथे या जागरूक पालकांच्या मुलांना ‘चांगले’ शिकवणार तरी कोण? ही वस्तुस्थिती विचारात घेतली तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. (School News)

…पण आपल्या पाल्याला ‘चांगलं’ शिकवायचं

सरकारी शाळांनी शे-दोनशेची देणगी मागितली तर एकीकडे का-कू करणारे पालक, दुसरीकडे मात्र इंग्लिश शाळांच्या मागणीप्रमाणे डोनेशनसाठी पैसे काढून देतात हा विरोधाभास दिसुन येत आहे. हा नेमका काय प्रकार आहे, हे काही कळत नाही. यातला एक भाग असाही दिसतो, की ग्रामीण भागातील ज्या पालकांची पहिली पिढी शिकलेली आहे, शिकलेली म्हणजे अल्पशिक्षित, अर्धसाक्षर. त्यातीलच अनेकजण पुढे कर्तेधर्ते झाले.  (School News)

सुधारित शेती, लहानमोठा व्यवसाय करू लागले. त्यातून त्यांच्याकडे थोडाफार पैसा आला. बाकी बहुसंख्य लोकांच्या घरात तर शिक्षणाची परंपराच नाही, त्यांना इंग्रजीची तर गंधवार्ताच नाही. आपल्याला नाही शिकता आले, पण आपल्या पाल्याला ‘चांगले’ शिकवायचे…आणि हे चांगले शिक्षण जणू फक्त केवळ इंग्लिश शाळांतून मिळते, असा पक्का ‘समज’ त्या मंडळींनी करून घेतल्याचे स्पष्टपणाने दिसते. कुटुंबातील वातावरण पूर्णपणे ग्रामीण मराठी वळणाचे असले तरी त्यांच्याशी इंग्लिशमधून कोण आणि कसे बोलणार? हे प्रश्न पालकांना अजिबात पडत नाहीत. (School News)

नावं मोठं अन् ‘लक्षण’…

मुले एकदा का तिकडच्या शाळेत घातली की झकपक ड्रेस, बूट, सॉक्स, टाय, स्कूल- बॅग, वाटरबॅग…केवढी मिजास असते त्या मुलांची! गावोगावी फिरणार्‍या स्कूल बसमधून ही टाईट-फाईट ‘लुक’मधली मुले जेव्हा ‘हाय…हॅलो…गुड मॉर्निंग…गुड बाय…’ असे म्हणू लागतात तेव्हा त्यांचे पालक मनोमन सुखावतात! तिथली सैनिकी पद्धतीची शिस्त…बसायला बाके…भव्य इमारती…इतकेच नाही तर ‘पॅरेंट डे’ ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे…’ आणि ‘अॅन्युअल डे’चा तो ‘कल्चरल प्रोग्राम’ म्हणजे तर केवढे ‘ग्रेट, ग्रँड सेलिब्रेशन’ असते!

तिथला तो चमचमाट, पालकांच्या खर्चातून आणलेली रंगीबेरंगी ड्रेपरी. कोरिओग्राफरच्या नजरेच्या इशाऱ्यावर आणि एखाद्या ढाकचिक…ढाकचिक गाण्याच्या तालावर मुले जेव्हा स्टेजवर येऊन नाचू लागतात, तेव्हा पालकांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटू लागते. मात्र या पाल्यांना शिक्षण चांगले मिळते का याची मात्र माहिती पालकांना मिळत नाही. व पालकही ती माहिती गोळा करण्याच्या फंदात पडत हे वास्तव आहे. (School News)

दरम्यान, पुर्व हवेलीमधील सर्वच गावातील सजग पालकांची मुले इंग्लिश मीडियमला गेल्यामुळे त्यांनी, आपआपल्या गावातल्या शाळेकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्या शाळेवर नैतिक दबाव ठेवण्याची संधीही त्यांनी आपल्या हाताने गमावली आहे. (School News)

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Big Breaking News : पुण्याच्या पुर्व भागात मटका, जुगारसह सर्व प्रकारचे अवैध धंदे 'खुलेआम' ; "वरिष्ठ" अधिकाऱ्यांच्या पंधराहुन अधिक कथीत "कलेक्टर" कडुन अवैध धंद्यांना खतपाणी; लक्ष पोलिस आयुक्तांच्या कारवाईकडे..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.