Big Breaking News इंदापूर : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथे काम करीत असताना मंगळवार (ता.१) विहिरीची रिंग कोसळून ४ कामगार ढिगाऱ्याखाली गाडले होते. एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न करून तब्बल ६६ तासानंतर ४ कामगारांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. (Big Breaking News)
सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय.३५ वर्ष),जावेद अकबर मुलानी (वय. ३५ ), परशुराम बन्सीलाल चव्हाण(वय ३० वर्ष) मनोज मारुती सावंत ( वय ४० वर्षे) असे ढिगाऱ्याखाली अडकेलेल्या कामगारांची नावे आहेत. तर यातील एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मात्र त्याचे नाव समजू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय अंबादास क्षीरसागर (सणसर, ता. इंदापूर) यांच्या म्हसोबावाडी (ता. इंदापुर) गावाच्या हद्दीत कवडे वस्ती लगत जमीन गट नंबर ३३८ मध्ये असलेल्या विहिरीचं रिंग बांधकाम सुरु होते. मात्र, मंगळवार (ता.१) अचानक या विहिरीचा मुरूम कोसळला आणि त्यासोबत लावलेली रिंग देखील खाली कोसळली. त्यामुळे त्यावर काम करत असलेले ४ मजूर देखील विहिरीत पडून ढिगाऱ्याखाली गाडले होते. (Big Breaking News)
अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि ‘एनडीआरएफ’च्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. पण विहिरीची खोली जास्त असल्याने आणि उर्वरित ‘रिंग’देखील जागा सोडत असल्याने शोधमोहिमेत अडथळा येत होता. सर्व अधिकारी महसूल आणि पोलिस विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होते. (Big Breaking News)
दरम्यान, गुरुवारी दुपारी मोठ्या क्रेनच्या साह्याने ६० टन क्षमतेची पोकलेन मशिन विहिरीत उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यामध्ये बचावकार्याला यश आले नाही. शेवटी दक्षिणेकडील बाजूची विहिरीची रिंग तोडून ‘रँप’ तयार करून पोकलेन मशिन उतरवण्यात आली. (Big Breaking News)
स्थानिक प्रशासन आणि ‘एनडीआरएफ’ने आज शुक्रवारी (ता.४) पोकलेन मशिनच्या सहाय्याने विहिरीच्या बाजूचा मातीचा ढिगारा हटविला. तेव्हा त्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या ४ कामगारांपैकी एकाचा मृतदेह तब्बल ६६ तासानंतर बाहेर काढण्यात आला आहे. तर अद्यापही तीन कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. स्थानिक प्रशासन आणि ‘एनडीआरएफ’ चे पथक शर्थीने प्रयत्न करीत आहेत.