Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : तब्बल ६६ तासानंतर विहिरीची रिंग पडून अडकलेल्या ४ कामगारांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 4 August 2023, 11:24

Big Breaking News इंदापूर : म्हसोबावाडी (ता. इंदापूर) येथे काम करीत असताना मंगळवार (ता.१) विहिरीची रिंग कोसळून ४ कामगार ढिगाऱ्याखाली गाडले होते. एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न करून तब्बल ६६ तासानंतर ४ कामगारांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. (Big Breaking News)

सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय.३५ वर्ष),जावेद अकबर मुलानी (वय. ३५ ), परशुराम बन्सीलाल चव्हाण(वय ३० वर्ष) मनोज मारुती सावंत ( वय ४० वर्षे) असे  ढिगाऱ्याखाली अडकेलेल्या कामगारांची नावे आहेत. तर यातील एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मात्र त्याचे नाव समजू शकले नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, विजय अंबादास क्षीरसागर (सणसर, ता. इंदापूर) यांच्या म्हसोबावाडी (ता. इंदापुर) गावाच्या हद्दीत कवडे वस्ती लगत जमीन गट नंबर ३३८ मध्ये असलेल्या विहिरीचं रिंग बांधकाम सुरु होते. मात्र, मंगळवार (ता.१) अचानक या विहिरीचा मुरूम कोसळला आणि त्यासोबत लावलेली रिंग देखील खाली कोसळली. त्यामुळे त्यावर काम करत असलेले ४ मजूर देखील विहिरीत पडून ढिगाऱ्याखाली गाडले होते. (Big Breaking News)

 

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि ‘एनडीआरएफ’च्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. पण विहिरीची खोली जास्त असल्याने आणि उर्वरित ‘रिंग’देखील जागा सोडत असल्याने शोधमोहिमेत अडथळा येत होता. सर्व अधिकारी महसूल आणि पोलिस विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होते. (Big Breaking News)

दरम्यान, गुरुवारी दुपारी मोठ्या क्रेनच्या साह्याने ६० टन क्षमतेची पोकलेन मशिन विहिरीत उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यामध्ये बचावकार्याला यश आले नाही. शेवटी दक्षिणेकडील बाजूची विहिरीची रिंग तोडून ‘रँप’ तयार करून पोकलेन मशिन उतरवण्यात आली. (Big Breaking News)

स्थानिक प्रशासन आणि ‘एनडीआरएफ’ने आज शुक्रवारी (ता.४) पोकलेन मशिनच्या सहाय्याने विहिरीच्या बाजूचा मातीचा ढिगारा हटविला. तेव्हा त्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या ४ कामगारांपैकी एकाचा मृतदेह तब्बल ६६ तासानंतर बाहेर काढण्यात आला आहे.  तर अद्यापही तीन कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.  स्थानिक प्रशासन आणि ‘एनडीआरएफ’ चे पथक  शर्थीने प्रयत्न करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंड तालुक्यात जेसीबीखाली चिरडून मजुराचा मृत्यू, अपघात लपवण्यासाठी मृतदेह कारच्या डिकीतून नेऊन रस्त्यावर फेकला; गुऱ्हाळ मालकासह चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 3 July 2026, 13:45

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29
Next Post

Tribute To N D Mahanor : हिरव्या बोलीचा रानकवी, निसर्गाचा गंध कायम दरवळत ठेवेल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.