Sunday, November 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमविवाहाच्या विरोधातून दोन कुटुंबे आमनेसामने; शिरूर पोलिस ठाण्यातच एकमेकांविरोधात तुंबळ हाणामारी…..

योगेश मारणेby योगेश मारणे
Friday, 30 October 2026, 21:33

शिरूर : कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच दोन गटांनी एकमेकांवर तुफान हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी (दि.30) दुपारी शिरूर येथील पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच घडली. प्रेमविवाहाच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान थेट पोलिस ठाण्याच्या आवारातील राड्यात झाले. दोन्ही बाजूंच्या महिला आणि पुरुषांनी एकमेकांवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव, दगडफेक आणि चप्पलफेक करीत तब्बल 20 मिनिटांहून अधिक काळ धुडगूस घातला. विशेष म्हणजे, पोलिसांसमोरच दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून जात असल्याने काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. या घटनेमुळे पोलिस ठाण्याच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील मलठण परिसरातील शिंदेवाडी येथील एका तरुण-तरुणीने काही दिवसांपूर्वी स्वेच्छेने विवाह केला होता. मात्र, हा विवाह दोन्ही कुटुंबीयांना मान्य नसल्याने त्यांच्यातून वादाची ठिणगी पडली होती. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही बाजूने सतत कुरबुरी सुरू होत्या. अखेर हा कौटुंबिक वाद शुक्रवारी (ता.30) थेट शिरूर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. दुपारी दोन्ही बाजूंचे 25 ते 30 जणांहून अधिक नातेवाईक पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.

पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही बाजूंच्या लोकांना बाहेर थांबवून संबंधित तरुण-तरुणींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास पोलिस ठाण्याबाहेर थांबलेल्या दोन्ही गटांतील काही जणांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक सुरू झाली. सुरुवातीला बाचाबाची आणि शिवीगाळीने सुरू झालेला वाद काही क्षणांतच हाणामारीत रूपांतरित झाला. एकमेकांच्या अंगावर धावून जात दोन्ही बाजूंच्या लोकांनी मारहाण सुरू केली.

पोलिस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतरही दोन्ही बाजूंचा संताप कमी झाला नाही. पुन्हा एकदा दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. तरुणांनी एकमेकांच्या दिशेने दगड भिरकावले, तर महिलांनी एकमेकींना शिवीगाळ करीत चपला फेकून मारल्या. या अचानक झालेल्या राड्यामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या हाणामारीत दोन तरुणांसह एका महिलेला गंभीर दुखापत झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांतील 25 ते 30 जणांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दोन्ही गटांमधील 25 ते 30 जणांवर कारवाई

याप्रकरणी प्रेमविवाह आणि कौटुंबिक वादातून दोन्ही गटांत हाणामारी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करून मारहाण केल्याप्रकरणी एका गटातील 18, तर दुसऱ्या गटातील 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली. दरम्यान, मलठण परिसरातील शिंदेवाडी येथील दोन कुटुंबांमध्ये हा वाद झाला असून, ही दोन्ही कुटुंबे एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक राहुल भागवत यांनी दिली.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कारागृहातच ठरला बँक लुटण्याचा प्लॅन! SBI बँकेतील 16 लॉकरवर मारला डल्ला; बडतर्फ पीएसआय निघाला मास्टरमाइंड

Saturday, 31 October 2026, 23:15

पुण्यात आणखी एक मोठा प्रकल्प! पेशवे पार्क ते पर्वतीपर्यंत रोप-वेचा प्रस्ताव; जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

Saturday, 31 October 2026, 22:33

आता ट्रॅफिकचा त्रास विसरा! पुणे मेट्रो लाईन-3 अखेर सुरू होणार; 3 नोव्हेंबरला उद्घाटन, ‘या’ तारखेपासून करता येणार प्रवास

Saturday, 31 October 2026, 22:08

‘दहा रोहित पवार आले तरी माघार नाही’; उजनी प्रकल्पावरून सचिन कल्याणशेट्टी आक्रमक

Saturday, 31 October 2026, 20:27

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

Saturday, 31 October 2026, 20:12

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत सर्वज्ञ कांचनला कांस्यपदक; उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीच्या श्रेया कांचनचा उत्स्फूर्त सहभाग

Saturday, 31 October 2026, 19:27
Next Post

मायलेकाने 18 व्या मजल्यावरून घेतली उडी! पिंपरी-चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना; टोकाचं पाऊल का उचललं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp