Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कारागृहातच ठरला बँक लुटण्याचा प्लॅन! SBI बँकेतील 16 लॉकरवर मारला डल्ला; बडतर्फ पीएसआय निघाला मास्टरमाइंड

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 31 October 2026, 23:15

जळगाव : जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेल्या दरोड्याच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे, कारागृहात असताना त्याची एका अन्य गुन्ह्यातील आरोपीशी ओळख झाली आणि याच ओळखीतून बँक लुटण्याचा कट रचल्याचा संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर जासक याने 2023 मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्टेट बँकेत 3.17 कोटी रुपयांचा दरोडा टाकला होता. या प्रकरणात त्याला कारागृहात जावे लागले. साधारण 2 ते 3 महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता.

दरम्यान, गजानन राजेंद्र पवार हा 2024 मध्ये चाळीसगाव परिसरात प्रेयसीच्या पतीच्या खून प्रकरणात कारागृहात होता. तोही सुमारे दीड महिन्यापूर्वी जामिनावर सुटला होता. जळगाव मध्यवर्ती कारागृहात असतानाच शंकर जासक आणि गजानन पवार यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी आणखी दोन साथीदारांना सोबत घेऊन दरोड्याची योजना आखल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.

बँकेत घुसून 16 लॉकर उघडण्यास भाग पाडले

चारही आरोपींनी भोकर येथील बँकेत प्रवेश केल्यानंतर छऱ्याच्या पिस्तुलाचा धाक दाखवला. बँक व्यवस्थापक आणि कॅशियरला धमकावत त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावण्यात आले. त्यानंतर बँकेतील 16 लॉकर उघडण्यास त्यांना भाग पाडले. लॉकरमधील सोने आणि रोकड पाच ते सहा बॅगांमध्ये भरून आरोपींनी तेथून पळ काढला. आरोपी जवळपास 40 ते 45 मिनिटे बँकेत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पळताना चार बॅगा रस्त्याच्या कडेला फेकल्या

दरोड्यानंतर शंकर जासक आणि गजानन पवार धरणगावच्या दिशेने निघाले. ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केल्याने जिल्ह्यात पोलिसांना सतर्क करण्यात आले. पळून जाताना आरोपींनी चावलखेड्याजवळ चार बॅगा रस्त्याच्या बाजूला फेकून दिल्या. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवली. अखेर शंकर जासक आणि गजानन पवार हे दोघे एका शेतात लपलेले असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणात अन्य दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुमारे 15 लाख रुपयांची रोकड आणि सोन्याने भरलेल्या बॅगा जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे.

इतर आरोपींच्या भूमिकेचा तपास सुरू

या दरोड्यात नेमके किती सोने आणि किती रोकड लुटण्यात आली, तसेच अन्य दोन आरोपींची भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. कारागृहातील ओळखीतून दरोड्याचे नियोजन झाल्याची माहिती समोर आल्याने भोकरमधील या घटनेची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

एक-दोन नव्हे, तरुणीचे तब्बल 11 बॉयफ्रेंड! तीन मुलांविरोधात तक्रार करायला गेली अन्…

Sunday, 1 November 2026, 22:37

उद्घाटनाआधीच पुणे मेट्रोची पोलखोल! स्टेशनमध्ये पाण्याची गळती; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Sunday, 1 November 2026, 21:32

पुण्यातील कंपनीत 5 लाखांची चोरी, शिक्रापूर पोलिसांनी थेट हरियाणातून आरोपीला पकडलं; दोन जणांना ठोकल्या बेड्या

Sunday, 1 November 2026, 20:17

दरीत कोसळली कार, समोर होतं मृत्यूचं संकट; पुण्यात एका झाडाने तिघांना दिलं जीवदान; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 1 November 2026, 19:21

Pune News: एकामागून एक 8 चोऱ्या; अखेर दोन आंतरराज्यीय चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, 5.50 लाखांचा माल जप्त

Sunday, 1 November 2026, 18:54

शिक्षणात आघाडी, तरी नोकरीत सुरक्षिततेचा पत्ता नाही; पुण्यातील तरुणांसमोर नेमकं कोणतं संकट? धक्कादायक वास्तव उघड

Sunday, 1 November 2026, 18:28
Next Post

नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी सूर्यदेवाची मोठी कृपा! राशींचं नशीब चमकणार, धनलाभासह सुखसमृद्धीचे योग; पाहा आजचं राशिभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp