सागर जगदाळे
Bhigwan Crime | भिगवण : अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथून समोर आला आहे. एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधामांनी अत्याचार केल्याची घटना काही दिवसापुर्वी घडली होती. यामध्ये मुलगी गर्भवती राहील्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला होता.
शेटफळगडे परिसरातील एका वीटभट्टीच्या ठिकाणी वेळोवेळी या मुलीवर अत्याचार करण्यात आले होते. दरम्यान यातील एका आरोपीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार (वय 45 वर्ष रा. शेटफळगडे ता. इंदापूर) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार (वय 45 वर्ष रा. शेटफळगडे ता. इंदापूर) व रमेश रघुनाथ मोरे (वय 35 वर्ष रा. शेटफळगडे ता. इंदापूर) या दोघांवर पोलिसांनी पोस्को कायद्यासह अट्रोसिटी दाखल केला होता.
आरोपी अर्जुन याने शेटफळगढे गावातील कालव्याजवळील एका शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शारीरिक संबंध ठेवू दिले नाही तर तुझ्या वडिलांकडे बदनामी करण्याची धमकी नराधांनी वेळोवेळी अल्पवयीन मुलीला दिली होती. या भितीतून दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. यातून मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहीली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर दोन आरोपीपैकी एक गावचा माजी उपसरपंच असल्याचे समोर आले. यातील एकास पोलिसांनी अटक केली होती, तर एकजण फरार होता. दरम्यान यातील एका आरोपीने आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.