Beed News : बीड : २० वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमविवाह केलेल्या या विवाहितेने तीन महिन्यातच आयुष्याचा शेवट केला. धक्कादायक म्हणजे पती आणि सासूच्या जाचास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. साता जन्माच्या सोबतीच्या आणाभाका, आयुष्यभर साथ देण्याचे वचन देऊन पतीने तीन महिन्यातच खरा चेहरा दाखवल्याने एका प्रेमविवाहाचा करुण अंत झाला. बीड जिल्ह्यातील सांगवीमध्ये ही घटना घडली आहे.
लग्नानंतर ३ महिन्यातच तिने आयुष्याचा केला शेवट
पायल आदेश चौधरी (वय २० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. (Beed News) याप्रकरणी बीडच्या अंभोरा पोलीस ठाण्यात पतीसह सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील कडा येथील पायल गोंदकर हिचे ठोंबळ सांगवी येथील आदेश चौधरी याच्यावर प्रेम होते. एकमेकांना पाहिलं आणि पाहताक्षणी दोघांचं एकमेकांवर प्रेम देखील जडलं. प्रेमात एकमेकांची साथ देण्याच्या आणाभाकादेखील घेतल्या. प्रेमाचं रुपांतर तीन महिन्यापूर्वी लग्नात झाले. (Beed News) पतीवर जीवापाड प्रेमकरत असलेल्या पायलने सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते. पण काही दिवसातच घरातील वातावरण बिघडले व पती व सासू त्रास देऊ लागले. या त्रासाला कंटाळून पायलने आत्महत्येचा निर्णय घेतला.
पायल आणि आदेश यांच्यात काहीना काही कारणावरून भांडण झाले. सासू आणि नवरा हे दोघेही पायलचा अतोनात छळ करू लागले. अनेक वेळा या छळाने सीमा ओलांडल्या. मात्र, पायल हे सर्वकाही सहन करत राहिली. कारण प्रेम विवाह केल्यामुळे तिला या गोष्टी कोणालाही सांगता येत नव्हत्या. (Beed News) अखेर या सततच्या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पायलच्या मामाने पती आणि सासूच्या जाचास कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Beed News : धक्कादायक! एमपीएससीत आठ वेळा अपयश, नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल
Beed News : वारकऱ्यांच्या दिंडीत घुसली भरधाव रिक्षा; वारकरी जखमी