Beed News : बीड : परभणीतील मनसे नेत्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि युवा सेनेचे मराठवाडा सचिव विपुल पिंगळे यांच्यावर अज्ञात टोळक्याकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली घटना
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे मराठवाडा विभागीय सचिव विपुल पिंगळे यांच्यावर पाच ते सहा जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Beed News) राजकीय वादातूनच पिंगळे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
विपुल पिंगळे हे कारमधून बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जात असताना अचानक सहा ते सात जणांच्या टोळक्यांने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. (Beed News) आरोपींनी दंडुके आणि लोखंडी रॉडने विपुल यांना मारहाण केली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी बीडमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सायंकाळी जिल्हा परीषदेच्या नविन इमारतीसमोर ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींनी बीडमधील साठे चौकापासूनच पिंगळे यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. बसस्टँडनजीक आरोपींनी पिंगळे यांच्या वाहनाला धक्का देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅफिक जास्त असल्याने विपुल यांनी कार थांबवली नाही. त्यानंतर शिवाजी चौकात येताच पांढऱ्या कारमधून बाहेर पडलेल्या सहा ते सात जणांनी विपुल पिंगळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. (Beed News) त्यानंतर त्यांनी आरडाओरड करताच आरोपींनी घटनास्थळावरून शहरातील बशीरगंज भागातून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रविवारी रात्री उशीरापर्यंत आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दुसरीकडे अहमदनगरमध्ये जुन्या वादातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश अत्तर यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चत्तर गंभीर जखमी झाले होते. (Beed News) त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज पहाटे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनांमुळे सध्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Beed News : पाहताक्षणी दोघांचं जडलं प्रेम, साता जन्माच्या आणाभाका, अन्…
Beed News : धक्कादायक! एमपीएससीत आठ वेळा अपयश, नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल