Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati News : बारामतीत भररस्त्यातून तरुणाचे अपहरण; ‘पत्नीला अपशब्द वापरल्याचा’ आरोप करत टोळीचा धुमाकूळ ; मुख्य आरोपीला अटक

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 30 April 2026, 14:14

Baramati News : बारामती, (पुणे) : बारामती शहरातील गजबजलेल्या रिलायन्स मॉल परिसरातून एका २३ वर्षीय तरुणाचे दिवसाढवळ्या कारमधून अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी तरुणाला निर्जन ठिकाणी नेऊन लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आणि त्याच्याकडील मोबाईलसह 15 हजार रुपयांची रोख रक्कम जबरीने लुटली. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात चार जणांसह इतर अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Baramati News

पिंटू उर्फ शरद धुमाळ, भारत मोहीते, अक्षय सोनवणे, अधिराज मोरे व इतर अनोळखी व्यक्तींविरोधात अपहरण करून मारहाण करणे आणि जबरीने वस्तू काढून घेण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पिंटू उर्फ शरद धुमाळ यास अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी प्रतिक धंगेकर (वय २३, रा. माळेगाव बुद्रुक) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Baramati News

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतिक धंगेकर हा पुण्यात नोकरी करतो. 24 एप्रिल रोजी दुपारी तो बारामतीतील रिलायन्स मॉल परिसरात उभा असताना, आरोपींनी कारमधून येऊन त्याला जबरदस्तीने गाडीत बसवले. ‘पिंटू धुमाळ याच्या पत्नीला अपशब्द का वापरले?’ असा जाब विचारत त्याला तांदुळवाडी रोडवरील एका हॉटेलच्या गोडाऊनजवळ नेण्यात आले. Baramati News

आरोपींनी केवळ मारहाणच केली नाही, तर प्रतिकवर ‘पिंटू धुमाळच्या पाया पडून माफी माग’ असा दबाव टाकला. या अपमानास्पद प्रकाराचे व्हिडिओ शूटिंग करण्याचाही आरोपींनी प्रयत्न केला. याशिवाय त्याच्या खिशातील 15 हजार ३०० रुपये, दोन मोबाईल आणि हातातील घड्याळ असा ऐवज आरोपींनी जबरदस्तीने हिसकावून घेतला. Baramati News

मारहाणीनंतर आरोपींनी प्रतिकला “पोलीस तक्रार केली तर जीवे मारू,” अशी धमकी देऊन रस्त्यावर सोडून दिले. या प्रकरणी पिंटू उर्फ शरद धुमाळ, भारत मोहीते, अक्षय सोनवणे, अधिराज मोरे व इतर अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी पिंटू उर्फ शरद धुमाळ याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. Baramati News

दरम्यान, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम आणि पोलीस जवान दादा दराडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. Baramati News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11
Next Post

Loni Kalbhor : ‘अजित मल्टीस्टेट’ सोसायटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! कर्जदार, जामीनदार सोडून निरपराध शेतकऱ्याच्या घर-जमिनीवर चढवला २४ लाखांचा बोजा? लोणी काळभोर येथील धक्कादायक प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.