Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : ‘अजित मल्टीस्टेट’ सोसायटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! कर्जदार, जामीनदार सोडून निरपराध शेतकऱ्याच्या घर-जमिनीवर चढवला २४ लाखांचा बोजा? लोणी काळभोर येथील धक्कादायक प्रकार

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 30 April 2026, 14:50

Loni Kalbhor लोणी काळभोर, ता. 30 : सहकारी संस्थांच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सासवड (ता. पुरंदर) येथील अजित मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निष्काळजी आणि बेफिकीर कामकाजामुळे लोणी काळभोर (ता. हवेली) येथील निरपराध शेतकरी महिलेच्या कुटुंबावर तब्बल २४ लाख रुपयांचा कर्जबोजा लादण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. Loni Kalbhor

अलका शिवाजी काळभोर यांच्या कुटुंबावर हा अन्याय ओढवला असून, मूळ कर्जदार आणि जामीनदार वेगळे असतानाही केवळ नाव साम्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर जप्ती बोजा नोंदवण्यासाठी फेरफार करण्यात आल्याचे समोर आले आहे. कर्जदार कालिदास सुदाम काळभोर यांच्या थकीत कर्जासाठी ही कारवाई करण्यात आली; मात्र जामीनदार व संबंधितांची योग्य शहानिशा न करता चुकीच्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आल्याने सोसायटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. Loni Kalbhor

मल्टी स्टेट को-ऑप. सोसायटी अधिनियम २००२ अंतर्गत वसुली प्रक्रियेत तब्बल २४ लाख ३६ हजार ३१५ रुपयांचा अॅवार्ड मिळवून सोसायटीने जप्ती आदेश काढला आणि तलाठी कार्यालयाकडे बोजा नोंदविण्याचे निर्देश दिले. परिणामी, गट क्रमांक २१५० आणि २२३६ मधील अलका काळभोर यांच्या मालमत्तेवर बोजा नोंदवण्यासाठी फेरफार क्र. १६५९४ व १६५९६ करण्यात आला आहे. यामुळे संबंधित कुटुंब आर्थिक संकटात सापडले असून मानसिक तणावाखाली जगत आहे. Loni Kalbhor

 

“दोन व्यक्ती एकाच नावाच्या असल्या तरी पडताळणी करणे ही सोसायटीची जबाबदारी होती; मात्र ती पार पाडण्यात पूर्ण अपयश आले,” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. “चोर सोडून संन्याशाला शिक्षा” असा संतापजनक प्रकार झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणामुळे सहकारी संस्थांच्या वसुली प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच निरपराध कुटुंबावरचा अन्याय तात्काळ दूर करावा, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. Loni Kalbhor

दरम्यान, या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी अजित मल्टी स्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे वसुली व विक्री अधिकारी सतीश महादेव जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यांच्या कार्यालयात संपर्क साधला असता, प्रथम “मिटिंगमध्ये आहेत” आणि नंतर “बाहेर गेले आहेत” असे सांगून टाळाटाळ करण्यात आली. यावरून संबंधित अधिकाऱ्यांची उदासीनता स्पष्ट होत असल्याची चर्चा आहे. Loni Kalbhor

“अजित मल्टी स्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयातून एक कर्मचारी आला होता. दोन्ही व्यक्तींची नावे साम्य असल्याने चुकीच्या व्यक्तीच्या नावावर बोजा चढवला जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गट क्रमांक २१५० आणि २२३६ मधील अलका काळभोर यांच्या मालमत्तेवरील बोजा कमी करण्यासाठी पत्रही देण्यात आले आहे. मात्र सध्या साईट डाऊन असल्यामुळे तपासणी करता आलेली नाही. दोन्ही व्यक्तींची नावे खरोखरच साम्य आहेत की यामागे आणखी काही वेगळा प्रकार आहे, हे साईट सुरू झाल्यानंतर स्पष्ट होईल. सध्या संबंधित नोंदीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.”
-अभिमन्यू करे (ग्राम महसूल अधिकारी, लोणी काळभोर, ता. हवेली) 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune News : "शिवाजी कोण होता" पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, प्रशांत आंबी यांच्यावर गुन्हा दाखल करावा ; छत्रपती शिवरायांच्या सरदारांच्या वंशजांकडून पुण्यात मागणी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.