Baramati News पुणे : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे अनेक घटनांवरून अधोरिखित झाले आहे. खून, दरोडे, सायबर गुन्हे, कोयता गॅंगची दहशत वाढीस लागली आहे. आता तर पुण्यातील कोरेगाव पार्क येथे बारामतीतील एका व्यावसायिकाला खंडणी मागून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याची प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Baramati News)
दरम्यान, याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ जुलै रोजी रात्री साडेआठ ते १ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत बारामती येथील ३७ वर्षांच्या व्यावसायिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Baramati News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मित्रांसह कोरेगाव पार्क येथील डेझर्ट वॉटर येथे जेवणासाठी आले होते. त्यांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. कार पार्किंगमध्ये पार्क करुन ते जेवायला गेले. जेवून परत आल्यानंतर दरवाजावर बंद पाकिट चिकटवले होते. उघडून पाहिले असता, फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची मागणी केली. (Baramati News)
दरम्यान, फिर्यादी यांनी मित्राच्या मोबाईलवरुन चिठ्ठीवर दिलेल्या नंबरवर फोन केल्यावर कोणी उचलला नाही. त्यानंतर दुसर्या दिवशी ते जेजुरी येथे असताना फिर्यादीच्या मोबाईलवर फोन आला. कुटुंबियांचा जीव वाचवायचा असल्यास आम्हाला कोरेगाव पार्क येथे १० लाख रुपये आणून दे, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. कोरेगाव पार्क पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Baramati News)