पुणे : बाणेर येथील एका मसाज सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय चालत असल्याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांना पर्दापाश करण्यात यश आले आहे. पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा टाकून ३ तरुणींची सुटका केली आहे. याप्रकरणी मसाज मालकावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मसाज सेंटर चालक पुष्पा केशव शिंदे (वय ३३, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अण्णा माने यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी-बाणेर रस्त्यावरील गणराज चौकातील एका इमारतीत स्पंदन स्पा नावाच्या मसाज सेंटरमध्ये हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा टाकून तीन तरुणींची सुटका केली आहे.
दरम्यान, आरोपी पुष्पा शिंदेने महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ओढल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार आणि पथकाने ही कारवाई केली.