पुणे : मावळचे माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दिगंबर बाळोबा भेगडे यांचे दुपारी दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
दिवंगत दिगंबर भेगडे यांच्यामागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परीवार आहे. भेडगे यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता कुंडमळा, शेलारवाडी येथे करण्यात येणार आहे.
दिगंबर भेगडे हे मावळमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर दोन वेळा निवडून आले होते. मावळ पंचायत समितीचे ते उपसभापती म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला होता.