पुणे : हिंजवडी, वाकड, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल व महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला हिंजवडी तपास पथकाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आकाश वजीर राठोड (वय-२२ रा. मु.पो. मुलखेड ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ७ मोबाईल फोन, दोन सोन्याची मंगळसूत्र असा १ लाख ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चैन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता वरीष्ठांनी मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकातील पोलीस हवालदार धुमाळ, कुदळ व पोलीस नाईक चव्हाण हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना पोलीस नाईक श्रीकांत चव्हाण यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि मोबाईल चोरीतील गुन्हेगार आकाश राठोड याने म्हाळुंगे येथून मोबाईल चोरी केला असुन त्याने तीन ते चार दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड परिसरात चैन चोरीचे गुन्हे केले आहेत. व तो पुन्हा मारुजी रोड हिंजवडी परिसरात चैन चोरी करण्यासाठी येणार आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी सापळा रचून वरील आरोपीला ताब्यात घेतले. त्याचा नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव व पत्ता विचारले असता वरीलप्रमाणे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता जबरी मोबाईल चोरीचे व चैन चोरीचे चार गुन्हे हिंजवडी, वाकड, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी ७ मोबाईल फोन, दोन सोन्याची मंगळसूत्र असा १ लाख ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बंडु मारणे, बाळकृष्ण शिंदे, पोलीस हवालदार बापु धुमाळ, विक्रम कुदळ, कैलास कंगले, पोलीस नाईक श्रीकांत चव्हाण, अरुण नरळे, रितेश कोळी, चंद्रकांत गडदे, पोलीस शिपाई कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, मा. पोलीस उपआयुक्त सो. परिर कार्यालयाकडील पोलीस उप निरीक्षक पवार व पोलीस शिपाई पंडीत यांच्या पथकाने केली आहे.