पुणे : ए.टी.एम.मशीन फोडून चोरी करणाऱ्या एका आंतर जिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चाकण परिसरात जेरबंद केले आहे.
प्रणीत दयानंद गोसावी (वय-२४, सध्या रा धाडगेमळा, अथर्व पॅटसन बिल्डींग, चाकण ता. खेड) मुळ रा. चिंचणी ता. खटाव जि. सातारा), शुभम भाऊलाल नागपूरे (वय-२२, सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी, नानेकरवाडी, चाकण ता. खेड, मुळ रा आष्टी ता तुमसर जि. भंडारा) शुभम युवराज सरवदे (वय-१९), आकाश मोडक नागपुरे (वय-२२), कार्तिक मुलचंद गौपाले (वय-२९, रा. सर्वजन ज्ञानेश्वर कॉलनी, नाणेकरवाडी, चाकण ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेळू गावचे हद्दीत वेळू फाटा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडीयाचे कॅश डिस्पेसर मशीन तीन अनोळखी इसमांनी ए.टी.एम. मशीनचे नुकसान करून चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याबाबत राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना योग्य त्या सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार सदर घटनेचा तपास पोलीस करीत असताना आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेल्या संशयीत चारचाकी वाहनाचा सी. सी. टी. व्ही. फुटेजच्या आधारे शोध घेतला.
संशयीत वाहन व आरोपीबाबत एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा प्रणीत गोसावी, रा चाकण याने त्याचे साथीदारांचे मदतीने केला आहे. त्या अनुषंगाने प्रणीत गोसावी याला चारचाकी वाहनासह ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या साथीदारांसमवेत केला असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार वरील सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी शनिवारी (ता. १८) डिसकळ ता खटाव जि सातारा येथील सोनाराचे दुकान फोडून चोरी केली असून त्याच गावातील टाटा कंपनीचे ए.टी.एम. फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपींना राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब डोलेयांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे नियंत्रणाखाली सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उप निरीक्षक प्रदीप चौधरी, गणेश जगदाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, दिपक साबळे, अजित भुजबळ, राजू मोमीण, हेमंत विरोळे, पोलीस नाईक अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, तुषार भोईटे, संदिप वारे, दगडु विरकर, अक्षय नवले, निलेश सुपेकर यांनी केली आहे.