पिपंरी : अलीकडील घटनांमध्ये किरकोळ कारणावरून खून आणि हाणामारीच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्याचे दिसत आहे. अशातच आता पिंपरी चिंचवड शहरात अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारींचे प्रमाण चिंताजनक स्तरावर पोहोचलं असल्याचं समोर आलं आहे. जानेवारी 2024 ते एप्रिल 2025 या 16 महिन्याच्या कालावधीत तब्बल 554 अल्पवयीन मुलांवर गंभीर होण्याची नोंद झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल 554 अल्पवयीन मुलांवर खून, मारहाण, दंगल, चोरी,विनयभंग, बलात्कार यासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. हे प्रमाण समाजासाठी गंभीर इशारा ठरत असून मुलांच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे पालक आणि समाजाने सजग राहण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
अल्पवयीन मुलांची गुन्हेगारीकडे वळण्याची कारणे
1.सामाजिक दबाव व चुकीचे आदर्श
2. कौटुंबिक कलह व अस्थिरता
3. आर्थिक गरिबी व शिक्षणाचा अभाव
4. व्यसनाधीनता व नैराश्य
5. सोशल मीडियाचा अतिरेक आणि समुपदेशनाचा अभाव
दरम्यान पिंपरी चिंचवडमधील वाढती बाल गुन्हेगारी ही केवळ पोलिसांची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे.