Akola | अकोला : राज्यातील अकोल्यातील जुने शहर पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी (१३ मे २०२३) संध्याकाळी किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. एका व्हिडिओमध्ये दोन्ही गटांचे सदस्य एकमेकांवर दगडफेक करताना, वाहनांचे नुकसान करताना आणि रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहेत.
शहरात कलम १४४ लागू…
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी शहरात कलम १४४ लागू करण्याचे आदेश दिले.
या घटनेत वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, अशीही माहिती समोर येत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अकोल्याचे एसपी संदीप घुगे यांनी सांगितले. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार अकोला शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
अकोल्यातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी अकोट फाईल परिसरातील शंकर नगर परिसरात दोन गटात हाणामारी झाली होती.