जुन्नर : जमिनीच्या वादातून मागील पाच दिवसापूर्वी पुरंदर तालुक्यात काकाने चक्क पुतण्याच्या अंगावर चक्क रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच , जुन्नर तालुक्यातही जमिनीच्या वादातून काका-पुतण्यांमध्ये लाठ्या-काठ्यांनी फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना वडगाव सहाणी येथे घडली आहे.
या हाणामारीची व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. तर याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जुन्नर येथे जमिनीच्या वादातून काका पुतन्यांमध्ये तुफान हाणामारी pic.twitter.com/nTYQFWSvSi
— vishal kadam (@vishalk96458591) January 12, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादावरून काका आणि पुतण्यांमध्ये वाद सुरु होते. या वादाचे रुपांतर भांडणामध्ये झाले. त्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करत कुटुंबच एकमेकांना मारहाण करू लागले.
पुरुषांमध्ये सुरू झालेल्या या हाणामारीमध्ये नंतर महिलांनीही सहभाग घेतला. यावेळी झालेल्या मारहाणीत हातात येईल त्या वस्तूंनी एकमेकांना मारहाण होत होती. ही हाणामारी थांबवण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्यामुळे अनेकांची डोकी फुटली आहेत. याप्रकरणी जुन्नर पोलिस पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जुन्नर पोलीस करीत आहेत.
पुरंदर तालुक्यात काकाने पुतण्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे काय आहे प्रकरण
वाघदरवाडी (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीत भास्कर त्रिंबक भुजबळ व नानासाहेब त्रिंबक भुजबळ या दोन सख्ख्या भावांची शेती आहे. या शेतात भास्कर भुजबळ यांनी त्यांची भावजय शारदा नानासाहेब भुजबळ यांना विचारात न घेता उसाचे पिक घेतले होते.
या उसाची शनिवारी (ता. ०७) उसतोड सुरु होती. तेव्हा शारदा भुजबळ व त्यांचा मुलगा स्वप्नील हा उस तोडणीचे काम थांबविण्या करीता गेले होते.
यावेळी भास्कर भुजबळ यांनी शारदा भुजबळ व स्वप्नील भुजबळ यांना अगोदर कर्जाचे पैसे दया. असे म्हणुन शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर भास्कर भुजबळ याने स्वप्नील भूजबळ याच्या अंगावर एक लिटर मापाचे प्लाटीक कॅन्ड मधील राँकेल टाकुन हातातील लाकडी पेटत्या टेम्ब्याने पेटवुन देवुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, याप्रकरणी शारदा भुजबळ यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भास्कर त्रिंबक भुजबळ याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.