लोणी काळभोर : वडारवाडी (चतुःशृंगी, पुणे) येथे दुचाकीचा धक्का लागल्याच्या वादातून झालेल्या मारामारीतील आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जमीन मंजूर केला केल्याचे आदेश न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी दिले असल्याची माहिती माहिती अॅड. पुष्कर पाटील यांनी दिली.
आकाश संजय ओरसे असे अटकपूर्व जमीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव असून या प्रकरणात विकास शेट्टीबा गुंजाळ (२१, रा. वडारवाडी, पुणे) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विकास गुंजाळ आणि त्यांचे मित्र विनायक डोंगरे हे दोघेजण दुचाकीवरून २५ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वडारवाडीकडे चालले होते. तेव्हा त्यांची मोटारसायकल कुसाळकर बंगला चौकात आली असता, गुंजाळ यांच्या दुचाकीचा एका मुलाला धक्का लागला.
तेव्हा आरोपी अभी ओरसे, जतीन विटकर, सागर ऊर्फ शुभम दुबळे, रोहन घोलप, छोटु (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), निलेश साळवी व त्यांचे इतर मित्रांनी विकास गुंजाळ व त्यांचे मित्र विनायक डोंगरे यांना लोखंडी कोयता, बांबू व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी गुंजाळ यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर आरोपी आकाश ओरसे याने अॅड पुष्कर पाटील, अॅड. आर. आर. पाटील, अॅड. प्रणव मते, अनुज मंत्री यांच्या माध्यमातून जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अॅड पुष्कर पाटील यांनी प्रथमदर्शनी या गुन्ह्यात आरोपीचा सहभाग नसल्याचा युक्तिवाद पुणे जिल्हा सत्र न्यायालयात सादर केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी आरोपी आकाश ओरसे याला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, आरोपी आकाश ओरसे याला पोलीस आधिका-यांनी चौकशीसाठी बोलावल्यास पोलीस ठाण्यात हजर रहाणे, गुन्ह्यातील पुराव्याशी छेडछाड न करणे, साक्षीदारांना भीती दाखवू नये, अशा अटींवर न्यायालयाने हा अटकपूर्ण जामीन मंजूर केला आहे.