Accident | दौंड : दुचाकीवरून जेवणासाठी मित्रासोबत हॉटलमध्ये जात असताना एका टोरँटो सीएनजीची वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा अपघात केडगाव-चौफुला रोडवर घडला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
सीएनजी वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना…
या परिसरात सीएनजी वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. मित्राचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्यामुळे त्याच्या मित्रांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
याप्रकरणी मृत तरुणाचा मित्र नितिन प्रभाकर कठाळे (वय 27 रा. केडगांव, ता.दौंड जि.पुणे) याने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषिकेश विलासराव शेनगांवकर असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेशने त्याचे मित्र नितिन व विजय बसके यांना हॉटेलमध्ये जेवण करण्यास जाण्यासाठी फोन केला. त्यानंतर हे तिन मित्र जेवणासाठी चौफुला दिशेने दुचाकीवरून हॉटेलकडे जेवायला निघाले. यावेळी केडगांवकडून एक टोरॅन्टो सीएनजी गॅस कंपणीच्या भरधाव टॅम्पोने ऋषिकेशच्या दुचाकीला जबर धडक दिली. तसेच टेम्पाने त्यास काही अंतरावर फरफटत नेले.
दरम्यान ऋषिकेश हा त्या टॅम्पोच्या चाकाखाली आला व चिरडला गेला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सीएनजी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने वाहन तेथेच सोडून पळ काढला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Yavat | माणकोबा वाडा फाटा बनला ॲक्सिडेंट पॉइंट ; सिग्नल बसवण्याची ग्रामस्थांकडून मागणी