Accident News : पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळजवळील यावली येथे अज्ञात मालट्रक व कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. ही दुदैवी घटना बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातातील जखमींना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Accident News)
सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमधील प्रवासी हे अहमदनगर येथील पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथील रहिवासी आहेत. ते अहमदनगर येथून सोलापूरच्या दिशेने येत होते. महिला भाविक कारमधून तुळजापूरला दर्शनासाठी चालल्या होत्या. कार यावलीजवळ आली असता, बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सोलापूर महामार्गावर सोलापूरकडे जाणाऱ्या मालट्रकची आणि कारची भीषण धडक बसून हा अपघात झाला.
ही धडक भीषण होती. यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Accident News)
दरम्यान, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे, अशी प्राथमिक माहिती मोहोळ पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अपघातामधील मृत हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निकतवर्तीय नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.