Accident News : उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर रस्ता ओलांडताना दुचाकीने दिलेल्या धडकेत जावजीबुवाचीवाडी (ता. दौंड) येथील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी (ता. २८) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
राजाराम बाप्पु राजवडे (वय- अंदाजे ६५, रा. जावजीबुवाचीवाडी, ता. दौंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर मशज़िद शेख़ (रा. बारामती) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मशज़िद शेख़ हे बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे – सोलापूर माहामार्गावरून बारामतीच्या दिशेने निघाले होते. यावेळी राजाराम राजवाडे हे रस्ता ओलांडत होते. याचवेळी दुचाकीचालक मशज़िद शेख़ यांचा दुचाकीवरील ताबा सुटला व राजवडे यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात राजवडे हे रस्त्यावर पडले तसेच दुचाकीचालक शेख हि दुचाकीसह रस्त्यावर पडले. सदर अपघाताची माहिती होताच उरुळी कांचन येथील लाईफ केअरच्या रुग्णवाहिकेत चालक अजित कांबळे व लाईफ केअर रुग्णवाहिकेचे मालक सिद्धू चव्हाण यांनी जखमींना तत्काळ उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, गुरुवारी (ता. २९) सकाळी राजाराम राजवडे यांचे उपचारादरम्यान निधन झाले तर जखमी असलेले चालक मशज़िद शेख़ यांना पुढील उपचारासाठी बारामती या ठिकाणी हलविण्यात आले आहे. अशी माहिती मिळत आहे.