अहमदनगर : नेवसा फाटा परिसरातील आंबेडकर चौकात भिक मागणार्या लहान मुलांना भिक न दिल्याने भर रस्त्यावर प्रवासी महिलेला आमानुष मारहाण करण्यात आली. भिक मागण्यार्या टोळ्या लहान मुलांना भिक मागण्यासाठी पाठवत आहे. या टोळीकडून त्या महिलेला मारहाण करण्यात आली.
शनिवारी (ता. ७ )दुपारी आंबेडकर चौकात नेवाशाला जाण्यासाठी एक महिला प्रवासी गाडीत बसलेली होती. तितक्यात भिक मागणारी अल्पवयीन मुलांची टोळी या महिलेला भिक मागण्यासाठी आली. या प्रवासी महिलेने पैसे न दिल्याने ही मुले त्या महिलेच्या हाता-पाया पडू लागली. तरीही महिलेने पैसे न दिल्याने भिक मागणार्या या मुलांनी महिलेला शिवीगाळ केली. त्यामुळे संबंधित महिलेने या मुलांना चांगलेच सुनावले.
हा प्रकार सुरू असताना त्यांना भिक मागायला लावणार्या टोळीतील काही महिला, पुरुष घटनास्थळी आले. यावेळी भिक न देणार्या महिलेला धक्काबुक्की करण्यात आली. तसेच, महिलेला मारहाणही करण्यात आली. हा सर्व प्रकार घडत असताना बघ्यांची एकच गर्दी झाली होती. मात्र, भिकार्यांच्या दहशतीमुळे कोणीही महिलेला सोवडले नाही.
नेवासा फाटा येथे शनि शिंगणापूर, शिर्डी, तसेच औरंगाबादकडे जाणार्या येणार्या वाहनांची संख्या अधिक असते. यावेळी प्रवाशी मोठ्या प्रमाणात येथे थांबतात. याचा फायदा घेत भिक मागणार्या टोळीकडून अल्पवयीन मुलांना भिक मागण्यासाठी लावले जात आहे. ही अल्पवयीन मुले भिक मागण्यासाठी दररोज रस्त्यावर येवून दयामया करत, पैसे मागत फिरताना दिसून येतात.