दौंड : दौंड शहरातील एका इसमाची बळजबरीने खतना केल्याच्या आरोपातील मुख्य आरोपी कमल कुरेशी व खतना करणारा डॉ. खान साहब यांना दौंड पोलिसांनी अटक केली आहे
मिळालेल्या माहितीनुसार कुमेल कुरेशीला सोलापूर व खान साहब याला अहमदनगर येथून पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात आसिफ शेख याला सर्वप्रथम काल रात्री अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीची संख्या तीन झाली आहे.
असिफ शेख याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज बाकी दोन्ही आरोपीना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, हवलदार सुभाष राऊत व कॉन्स्टेबल अमोल देवकाते यांच्या पथकाने आरोपीना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.