पुणे : अंजुमन इराणी ग्रुपचा सदस्य असल्याचे सांगुन केस मागे घेण्याचे नावाखाली ४० लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या इराणी आरोपीला गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी जेरबंद केले आहे.
फर्जाद मोहम्मद रिझा फखाबादी (वय- ३१, रा. फ्लॅट नं. ५०३, सुप्रीम क्लासिक, सांळुखे विहार. एन.आय.बी.एम. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटनेतील फिर्यादी महिला व तिच्या मुलाला अंजुमन इराणी ग्रुपचा सदस्य असल्याचे सांगुन फर्जान फखाबादी हा ४० लाख रुपयाची वारंवार खंडणीची मागणी करीत होता. गुरुवारी (ता.०६) तीन अनोळखी इसमांनी दुचाकीवर येवुन गाडी थांबवुन त्यांना ४० लाख रुपये दया, नाहीतर तुम्हाला बघुन घेवुन अशी धमकी दिल्याने त्यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी अर्ज दिला होता.
सदर अर्जाची तात्काळ दखल घेत गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांचे पथक तयार करून सदर इसमाबाबत काहीएक सुगाव नसतांना, अंजुमन इराणी ग्रुपचा सदस्य फर्जान फरयाबादी यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वरीलप्रमाणे नाव सांगितले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने फिर्यादी यांचे मुलावर सन २०१८ मध्ये दाखल झालेल्या गुन्हयातील फिर्यादी हया त्याची मैत्रिण असुन तीला मी केस मागे घेण्यास सांगतो असे खोटे कारण सांगुन फिर्यादी यांचेकडुन ४० लाख रुपयेची खंडणी मागीतली असल्याचे सांगितल्याने, त्याचेविरुध्द कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे – १ गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, पोलीस अमलंदार, संजय जाधव, उज्वल मोकाशी, मोहसीन शेख, गजानन सोनुने, साधना ताम्हाणे, समिर पटेल, निखील जाधव, कादीर शेख यांनी केली आहे.