हडपसर : धावत्या पीएमपी बसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे. बस चालकाच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदाम शंकर चौगुले ( वय ५७, रा. गोसावी वस्ती, वैदूवाडी, हडपसर ) असे मृत्यु झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. याप्रकणी चौगुले यांची मुलगी मालन चौगुले (रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौगुले हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त पीएमपी बसमधून निघाले होते. चौगुले हे पीएमपी बसच्या दरवाज्यात थांबले होते. त्यावेळी चालकाने भरधाव वेगाने बस चालविली आणि चौगुले यांचा तोल जाऊन खाली पडले. या अपघातात चौगुले गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी चौगुले यांची मुलगी मालन चौगुले यांनी हडपसर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यानुसार भरधाव वेगाने पीएमपी बस चालवून प्रवाशाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्या प्रकरणी पीएमपी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.