Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्याच्या औद्योगिक वीज वापरात वाढ,औद्योगिक ग्राहक संख्येत वाढ ; महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची माहिती…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 December 2022, 11:08

मुंबई : राज्यातील औद्योगिक क्षेत्राच्या वीजवापरात गेल्या आर्थिक वर्षातील मासिक सरासरी ३८३३ दशलक्ष युनिटवरून वाढ होऊन ती ४१०१ दशलक्ष युनिट इतकी झाली आहे. तसेच राज्यातील औद्योगिक वीज ग्राहकांची संख्याही वाढली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी दिली.

सिंघल म्हणाले की, २०२१ – २२ या आर्थिक वर्षात उच्चदाब औद्योगिक ग्राहकांनी एकूण ३९,३९७ दशलक्ष युनिट वीज वापरली होती तर लघुदाब औद्योगिक ग्राहकांनी ६,६०६ दशलक्ष युनिट वीज वापरली होती. एकूण औद्योगिक वीज वापर ४६००३.२६ दशलक्ष युनिट इतका होता.

त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षातील सरासरी मासिक औद्योगिक वीज वापर ३८३३ दशलक्ष युनिट होता. २०२२ -२३ या चालू आर्थिक वर्षात राज्यातील औद्योगिक वीज वापरात वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात औद्योगिक ग्राहकांना ३२८०८ दशलक्ष युनिट विजेची विक्री झाली असून हा वीजवापर मासिक सरासरी ४१०१ दशलक्ष युनिट इतका आहे.

 

अधिक माहिती देताना सिंघल म्हणाले की, राज्यातील नवीन औद्योगिक कनेक्शन घेणाऱ्या वीज ग्राहकांची संख्याही वाढली आहे. २०२१ -२२ या आर्थिक वर्षात राज्यात एकूण उच्चदाब औद्योगिक वीज ग्राहक १४,८८५ होते. त्यांची संख्या या आर्थिक वर्षात वाढून नोव्हेंबरपर्यंत १५,०७८ झाली आहे. लघुदाब औद्योगिक वीज ग्राहकांची संख्याही ३,८१,२७२ वरून वाढून ३,८३,२७२ इतकी झाली आहे. नोव्हेंबरअखेर राज्यात एकूण औद्योगिक वीज ग्राहकांची संख्या ३,९८,३५० इतकी झाली आहे.

राज्यामध्ये औद्योगिक वीज ग्राहकांना वीजदरात विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. विद्युत आकारावर १५ टक्के लोड फॅक्टर सवलत, ठोक वीज वापर सूट, लवकर वीजबिल भरले तर सूट, अतिउच्चदाब ग्राहकांना वहन आकारातील बचत, विजेचा वापर रात्री दहानंतर केल्यास दरात सवलत अशा सवलती दिल्या जातात.

अशा सर्व सवलतींचा लाभ घेतला तर उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना सरासरी ५ रुपये प्रति युनिट दराने वीज आकारणी केली जाते. या खेरीज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागातील तसेच डी आणि डी प्लस औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना वीजदरात सवलत दिली जाते, अशी माहिती त्यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30
Next Post

हडपसर येथे धावत्या पीएमपी बसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू, चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.