सागर जगदाळे
भिगवण,(पुणे) : भिगवण ग्रामपंचायत हद्दीत बाजारपेठ परिसरात रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ५९ वाहनचालकांवर भारतीय दंड संहिता कलम २८३ प्रमाणे गुन्हे दाखल करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
तर भिगवण परीसरामध्ये गाडयांचे हॉर्न वाजवून, गाडयांच्या पुंगळ्या काढुन शाळेच्या तसेच मुख्य चौकामध्ये हुल्लडबाजी करीत फिरतात व शिक्षणा पासुन दुर जावून एकमेकांसोबत भांडण तंटा करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असतात. अशा प्रकारे कृत्य करणाऱ्या ६ मुलांचे विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १६० प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या भिगवण, मदनवाडी, तकारवाडी परीसरातील रस्त्यांचा सर्व्हे करून बेशिस्तरित्या वाहने पार्क करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे वाहनांवर कारवाई करण्याला सुरुवात करण्यात आली आहे, कोणीही वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने वाहने पार्क करू नयेत. व प्रशासनास सहकार्य करावे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने वाहने पार्क केल्यास त्याचेवर भारतीय दंड संहिता कलम २८३ प्रमाणे कारवाई करण्यात येईल अएही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. कॉलेज, शाळा, मुख बाजारपेठ परीसरामध्ये बीट पेट्रोलॉग नेमुण वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे.
भिगवण पोलिसांकडून नागरिकांना आवाहन..!
भिगवण, मदनवाडी, तक्रारवाडी व आजुबाजुच्या परीसरामधील नागरीकांनाही भिगवण पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की, आपण आपले मुलांना शाळा, कॉलेजमध्ये पाठवित असताना मुलांकडे बारकाईने लक्ष दयावे. आपला मुलगा शाळेमध्ये कसा आहे. याबाबत शिक्षकांना वेळावेळी भेटुन त्यांचेकडुन माहीती घ्यावी. आपले मुलांचे करियर ओळखुन त्यांना वाईट मार्गपासून परावृत्त करावे. वरील प्रमाणे कृत्य करीत असताना मुले मिळून आल्यावर त्याचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांचे करियर (भवितव्य) खराब होण्याची शक्यता आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष दयावे. असे आवाहन केले.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक,बारामती विभागाचे आनंद भोईट ,अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभागचे गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील,सहाय्यक पोलीस फौजदार दत्तु जाधव, पोलीस अंमलदार गणेश कर्वे, प्रसाद पवार, सचिन निकम यांनी केली आहे.