पॅरिस: गुरुवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या चीनच्या ‘वू यू’कडून दोन वेळची विश्वविजेती निखत जरीनचा एकतर्फी पराभव झाल्याने भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का बसला. महिलांच्या 50 किलो वजनी गटात आव्हान देण्यासाठी आलेल्या निखतला वू यूसमोर कोणतीही जादू दाखवता आली नाही आणि 0-5 अशा पराभवाने तिचे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.