-ओमकार भोरडे
तळेगाव ढमढेरे (पुणे) : दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या आरोपींना लोणीकंद पोलीसांनी सापळा रचून अखेर त्यांना ताब्यात घेतले आहे.
कुमार मोहन पवार, (वय 22, रा. मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली, पुणे), नितीन मोहन पवार, (वय 19, रा.मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली, पुणे), ओम लक्ष्मण गव्हाणे, (वय 19, रा. लेन नं. 2. साई सत्यम पार्क, उबाळेनगर, वाघोली, पुणे), मनोज सुखदेव निंबाळकर, (वय 21. रा. मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली, पुणे), विकास दिगंबर कांबळे, (वय 21, रा. लेन नं. 26 उबाळेनगर, वाघोली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 30 जुलै) रोजी गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलीस अंमलदार हे युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना समीर पिलाने, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पो.स्टे.गु.र.नं. 734 / 2024 भारतीय न्याय संहिता कलम 310 (2), 140 (3), 351 (2) या गुन्ह्यातील आरोपी कुमार पवार, नितीन पवार, ओम गव्हाणे, मनोज निंबाळकर, विकास कांबळे हे आव्हाळवाडी गावच्या हद्दीत आव्हाळवाडी ते खराडी रोडवरील बायफ कंपनीजवळ लाल रंगाचे स्वीफ्ट गाडीसह उभे आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळताच पथकाने याठिकाणी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची स्विफ्ट कार तपासकामी जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे स्वाधीन केले आहेत.