गोंडा: उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एका विधवा चुलतीचे तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या पुतण्यासोबत प्रेमसंबंध होते. दोन मुले असूनही काकूंनी पुतण्यासोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. मात्र, पुतण्याच्या घरच्यांना त्यांच्या अफेअरची माहिती मिळताच प्रचंड खळबळ उडाली. घरच्यांनी पुतण्याचं लग्न दुसरीकडेच ठरवलं. चुलतीला हे कळताच ती ढसाढसा रडू लागली. तिने तिच्या पुतण्याला सांगितले की, ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही.
पुतण्याचंही चुलतीवर खूप प्रेम होतं. तो घरच्यांना म्हणाला की, मला फक्त माझ्या काकू आवडतात. मी फक्त त्यांच्याशीच लग्न करेन. घरच्यांना ही गोष्ट न पटल्याने चुलती आणि पुतण्याने धाडसाचे पाऊल उचलले. दोघांनी भरधाव वेगात असलेल्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिलेने आपल्या दोन लहान मुलांचीही काळजी केली नाही. तिच्यानंतर त्यांची काळजी कोण घेईल, याचा विचारही केला नाही?
हे प्रकरण गोंडा जिल्ह्यातील इटियाथोक भागातील आहे. येथील प्रेमप्रकरणाला विरोध झाल्याने संतप्त झालेल्या महिलेसह तिच्या पुतण्याने रविवारी धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इटियाथोक भागात 32 वर्षीय विधवा महिला तिच्या दोन मुलांसह तिच्या सासरच्या घरी राहत होती. त्यांचा २२ वर्षांचा पुतण्या रवींद्र कुमारही घरात राहत होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध झाले. चुलतीला आठ वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आहे. पण काकू आपल्या पुतण्यावरच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की तिला कुटुंब आणि समाजासोबतच स्वतःच्या मुलांचीही पर्वा नव्हती.
इतरत्र लग्न ठरवले
पुतण्या आणि चुलतीचे हे विचित्र प्रेम कुणालाही मान्य नव्हते आणि घरच्यांनी विरोध केला हे नक्की. रवींद्रच्या आई-वडिलांनी त्याचं लग्न दुसरीकडे ठरवलं. काकूंना तिच्या पुतण्याला कोणत्याही किंमतीत घोडयावर बसताना पाहायचे नव्हते. पुतण्याही लग्नाला विरोध करत होता.
दोघांनीही दिला आपला जीव
चुलती व पुतण्याला समाज आणि कुटुंबाचा अपमान आवडत नसल्याने दोघांनी रविवारी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. काठोवा रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर दोन्ही मृतांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.