उरुळी कांचन : महात्मा गांधी सर्वोदय संघाचे पद्मश्री मणिभाई देसाई विद्यालयातील प्राचार्य शिवाजी बोऱ्हाडे यांची चारचाकी गाडी दिवसाढवळ्या दोन तरुणांनी फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयाच्या गेटवरच हि घटना सोमवारी (ता. 29) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राचार्य बोऱ्हाडे हे रोजच्या प्रमाणे सुट्टी झाल्यानंतर चारचाकीतून घरी निघाले होते. गेटवर आले असता गेटसमोर दोन तरुण हे गाडीवरून घसरून पडले होते. अशी माहिती मिळत आहे. त्याच वेळी प्राचार्य बोऱ्हाडे हे चारचाकी गेटच्या बाहेर जाण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकाला हॉर्न वाजवून आवाज दिला.
दरम्यान, आम्ही पडलो तरीही आपल्याला हॉर्न वाजवला असे त्या तरुणांना वाटले आणि म्हणून एकाने प्राचार्य यांच्या गाडीवर मोठा दगड मारला तर दुसऱ्याने बोऱ्हाडे यांना मारहाण केली. असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये चारचाकी गाडीचे नुकसान झाले असून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.