–बापू मुळीक
सासवड (पुणे) : शिक्षक शिक्षकेतर सेवकांच्या पतसंस्था या 100 टक्के वसुली करणाऱ्या व नफ्यात येणाऱ्या पतसंस्था आहेत. कर्मचाऱ्यांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन अनेक पतसंस्था सुरू झाले आहेत. यातून कमी कागदपत्रात कर्मचाऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध होते. असे कर्ज थकणे किंवा बुडणे हे नगण्य असते. त्यामुळे त्या संस्था नेहमीच नफ्यामध्ये येतात. आचार्य अत्रे शिक्षक शिक्षकेतर सेवकांची पतसंस्था ही त्यापैकीच एक आहे. या संस्थांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी लक्ष द्यावे. विद्यार्थी कार्यशाळा, विद्यार्थी गुणगौरव, शिक्षकांचे उद्बोधन वर्ग असे कार्यक्रम ठेवून शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याचे काम या संस्था संस्थांनी करावे, अशी अपेक्षा आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीणचे अध्यक्ष विजय कोणते यांनी, संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना व्यक्त केली.
यावेळी राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल नंदकुमार सागर यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. आचार्य अत्रे पतसंस्थेची स्थापना 2001 मध्ये झाली. पतसंस्थेच्या स्थापनेपासून संस्थेचा सतत ऑडिट वर्ग ‘अ ‘ आहे. सातत्याने नऊ टक्के डिव्हीडंट सभासदांना दिला जातो. संस्थेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विजयदादा कोलते यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
याप्रसंगी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सहसचिव बंडूकाका जगताप, शिवाजी घोगरे पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर भालेराव, सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.